close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निखिल फाटक, महेश काळे आणि शर्वरी जमेनीस यांनी सादर केले 'शेंंदूर लाल चढायो'चं नवं व्हर्जन!

गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांंचाअधिपती आहे.

Updated: Aug 26, 2017, 04:21 PM IST
निखिल फाटक, महेश काळे आणि शर्वरी जमेनीस यांनी सादर केले 'शेंंदूर लाल चढायो'चं नवं व्हर्जन!

पुणे : गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांंचाअधिपती आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून पुण्याच्या तीन कलाकारांनी 'शेंदूर लाल चढायो' या आरती स्वरूपात असलेल्या गाण्याला खास अंदाजात रसिकांसमोर सादर केले आहे. 

प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक, अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस व गायक महेश काळे यांनी ' शेंदूर लाल चढायो' या गणेश आरतीला नव्या आणि तितक्याच दिलखेचक अंदाजात सादर केले आहे.नव्या स्वरूपात 'शेंदूर लाल चढायो' बांधण्याची मूळ कल्पना तबलावादक निखिल फाटक यांची आहे. निखिलच्या सोबतीने महेश काळे याने हे गाणं गायलं आहे. तर शर्वरी जमेनीस हीने शास्त्रीय नृत्याच्या अंगाने हे गाणं सादर केले आहे. 

वर्षानुवर्षे एकाच चालीत आणि ढंगात गाणी सादर केल्यानंतर नवा प्रयत्न फारसा उत्सुकतेने स्वीकारला जात नाही. मात्र निखिल, महेश आणि शर्वरीची मेहनत रसिकांच्या मनावर जादू करून गेली आहे. अल्पावधीतच या गाण्याला युट्युब तसेच सोशल मीडियामधून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या नव्या कल्पनेला तरूण आणि अनेक ज्येष्ठ मंडळीदेखील दाद देत आहेत.