Yoga Expert Ashuka at Anant Ambani Radhika Merchant Wedding: बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी त्यांचा फिटनेस किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. फीट राहण्यासाठी ते सगळे फक्त डायट करत नाहीत तर त्यासोबत जिम किंवा योगा देखील करतात. त्यात आज चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हॉट योगा टीचरची. ही योगा टीचर फक्त आलिया भट्ट आणि करीना कपूर नाही तर त्यासोबत रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी सारख्या कलाकारांना देखील योगा शिकवते. आता याच योगा टीचरनं अनंक अंबानी आणि राधिका मर्चेंटत्या मंगल उत्सवला हजेरी लावली आहे. तिच्या लूक्सनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांना प्रश्न होता की ही सुंदर स्त्री कोण आहे? तर या सेलिब्रिटी योगा एक्सपर्टचं नाव अंशुका आहे. अंशुका ही बड्या सेलिब्रिटींना योगा ट्रेनिंग देते. आता ती अंबानींच्या पार्टीत आली आहे. यावेळी अंशुकानं गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. त्यात अंशुकाची परफेक्ट फिगर दिसतेय. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिला अभिनेत्री समजलं. अंशुकाच्या लूकविषयी बोलायचं झालं तर तिनं गुलाबी सेक्विननं बनवण्यात आलेला हा लेहेंगा परिधान केला आहे. ज्यावर पांढऱ्या रंगाच्या धाग्यानं वर्क करण्यात आलं आहे. तर तिनं तिचा हा लूक कम्पलिट करण्यासाठी डायमिंड ज्वेलरी घातली आहे. त्यासोबत तिच्या हातात एक बटवा असल्याचे देखील दिसत आहे.
अंशुकाविषयी बोलायचं झालं तर तिचा मुंबईच्या वांद्रे परिसरात योग स्टुडियो आहे. तिच्या योग स्टुडियोमध्ये अनेक सेलिब्रिटी येतात. अंशुका गेल्या 10-12 वर्षांपासून सेलिब्रिटींची योगा ट्रेनर आहे. करीना कपूर, दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, रकुलप्रीत सिंग, अर्जुन कपूर, सैफ अली खान यांच्यासोबत तब्बल 20-25 बॉलिवूड सेलिब्रिटींना अंशुका योगा शिकवते. वजन कमी-जास्त पेक्षा सेलिब्रिटी अंशुकाकडे डान्स आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी, मानसिक शांतता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी योगा शिकायला येतात.
हेही वाचा : 'दुसऱ्याच्या बायकोला बघू नकोस', धोनीला मिठी मारलेल्या राधिकापेक्षा रणवीर-दीपिकाची चर्चा
योगा ट्रेनर होण्याआधी अंशुका ही जेय एअरवेजमध्ये कमर्शियल पायलट होती. या दरम्यान, एका मोटार बाईक अपघातात तिला गंभीर दुखापत झाली. शरिरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं. डोक्यावर जखम झाली होती. मनक्याला देखील गंभीर जखम झाली होती. यामुळे ती तब्बल 8 महिने ती बेड रेस्टवर होती. ती एक खेळाडू होती, स्विमिंगमध्ये तिला गोल्ड मेडल मिळाले आहेत. तर जेव्हा तिला 8 महिन्यांचा ब्रेक मिळाला होता तेव्हा तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. तिचं आयुष्य थांबलं होतं. तिच्यासाठी थोडीही हालचाल करणं शक्य नव्हतं. तिला मानसिकदृष्ट्या, भावनिक दृष्ट्या आणि शारिरीक दृष्ट्या खूप त्रास झाल्याचं तिनं सांगितलं होतं.