नितीन देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं कारण...; स्थानिक आमदारांकडून मोठा खुलासा

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून कर्जतचे स्थानिक आमदारांकडून त्यांच्या या टोकाच्या पावला मागचं कारण सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 2, 2023, 11:04 AM IST
नितीन देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं कारण...; स्थानिक आमदारांकडून मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Nitin Desai Sucide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. नितीन यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितिन देसाई यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाचे कारण समोर आले नसून त्यात पोलिस तपास घेत आहेत. त्यावर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

कर्जतचे आमदार महेश बालदी यांनी माध्यमांशी बोलताना नितीन देसाई यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की आज सकाळी चार वाजता त्यांच्या मेन हॉलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. गेल्या अनेक दिवसांपासून स्टुडिओमध्ये काम चालत नव्हता. आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती कार्यकर्त सुधीर ठोमरे आणि प्रविण मोरे यांनी दिली आहे. ते पोलिस त्यांच्या मृतदेह घेऊन गेले आहेत. आता त्यांच्या पार्थीवाचं पोस्टमार्टन होणार असून पुढची प्रक्रिया सुरु आहे. 

संगीतकार कौशल इनामदार माध्यमांशी बोलताना  म्हणाले की 'प्रचंड धक्का बसला आहे. मला विश्वास बसलेला नाही कारण मला ज्यांनी फोन करून सांगितलं त्यांना मी दोनवेळा विचारलं. खरंतर गेल्या वर्षभरात माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. त्याच्याआधी आमचं दोन-तीनवेळा बोलणं झालं होतं. ते देखील कामानिमित्तानं. त्यांना मी गेल्याच वर्षी कर्जतला भेटायला गेलो होतो.'  बालगंधर्व सिनेमाच्या निमित्तानं कौशल इनामदारक हे नितीन देसाई यांच्या संपर्कात आले होते. 

हेही वाचा : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल! ND Studio मध्ये संपवलं आयुष्य

मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी माध्यमा यावर प्रतिक्रिया देत सांगितले की, 'मला काही सुचत नाहीये. गेल्या काही महिन्यांमध्ये माझं आणि नितीनदादाचं बोलणं चालू होतं. पुण्यात एका फिल्म स्कूलबाबत आमचं बोलणं सुरु होतं. अचानक ही बातमी आली आहे. तो खूप मोठा माणूस होता. चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. दादानं असं का केलं? खूप मोठा धक्का आहे हा'

अमोल कोल्हे यांनी देखील नितीन देसाई यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत सांगितले की म्हणाले, 'हे खूप शॉकिंग आहे. खूप वर्ष आम्हीसोबत काम केलं आहे. फायटिंग स्पिरिट असणाऱ्या माणसाबाबत अशी बातमी ऐकायला मिळणं हे धक्कादायक आहे. मराठी माणसाची मान बॉलिवूडमध्ये त्यांनी उंच केली. आम्ही जवळपास सहा-सात वर्ष एकत्र काम केलं. दादांच्याबाबतीत अशी बातमी समोर येत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.'

नितीन देसाई यांनी आजवर ‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ 1942 ए लव्ह स्टोरी, जोधा अकबर सारख्या अनेक चित्रपटांचे सेट बनवले होते. तर 2000 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’साठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता. एन. डी . स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी त्यांना या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर ही बातमी समोर आली आहे.