मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा झाली. मात्र जेलमध्ये असलेल्या सलमान खानला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा होती. यावर एका जेल अधिकाऱ्याचे म्हणणे समोर आले आहे. जेल अधिकाऱ्याने सांगितले की, सलमानला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तिथे कोणत्याही मोबाईल फोनची सुविधा नाही. ना सेल्फी घेण्याची परवानी आहे. इतर कैद्यांना जे अन्न मिळते तेच सलमानलाही देण्यात येत आहे. बाहेरचे अन्न जेलमध्ये आणण्यास सक्त मनाई आहे.
रिपोर्ट्नुसार सलमानला जेलमध्ये चांगले अन्न मिळावे म्हणून कुटुंबियांनी ४०० रुपये जमा केले आहेत. आज सलमानचा जेलमधील तिसरा दिवस. जेल प्रशासनाने सांगितले की, सलमान आपला अधिकाधिक वेळ झोपण्यात घालवतो. मात्र व्यायाम नियमाने करतो. पहिल्या दिवशी जेलमध्ये सलमान जेवला नाही. मात्र दोन बहिणींना आणि प्रिती झिंटाला भेटल्यानंतर तो जेवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. सलमानला जेवण्याची, पाण्याची सोय तुरूंगात केली जात आहे. त्याला इतर कैद्यांप्रमाणे बाहेर येऊन जेवणाची परवानगी नाही.
No mobile phones or selfies are allowed, no outside food is coming inside, jail authorities are serving him food: Jodhpur Jail official on #SalmanKhan #BlackBuckPaochingCase pic.twitter.com/rzHF89mfDa
— ANI (@ANI) April 7, 2018
शनिवारी सकाळी सलमानला जेलमध्ये भेटणाऱ्या लोकांचा ओघ सुरू झाला. जेलचे अधिकारी त्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना सलमानला भेटण्यासाठी आणत होते. इतकंच नाही तर जेल अधिकाऱ्याच्या मुलाला सलमानने ऑटोग्राफही दिली.