नाही म्हणून देखील बादशाहला करावं लागलं 'हे' काम

काय आहे हे काम?

Updated: Jan 20, 2020, 08:42 PM IST
नाही म्हणून देखील बादशाहला करावं लागलं 'हे' काम

मुंबई: अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. सध्या बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि नोराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा, बादशाहला डान्स करण्यासाठी आग्रह करत आहे. त्यासाठी ती अनेक प्रकारचे फंडे आजमवताना दिसत आहे.

'हाय गर्मी' या गाण्यावर नोराने त्याला नाचण्यास भाग पाडले. अखेर तिने दिलेलं आव्हान स्वीकारत तो 'हाय गर्मी' या गाण्यावर थिरकला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रणाणावर व्हायरल होत आहे. 'स्ट्रीट डान्सर ३डी' मधील 'हाय गर्मी' अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री नोरा फतेही यांच्या घायाळ आणि बोल्ड अंदाजावर चित्रीत करण्यात आलंय. 

सोशल मीडियावर हे गाणं प्रदर्शित होताच काही तासांतच गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले. नोराचं हे गाणं देखील चाहत्यांच्या चांगलचं पसंतीस पडत आहे . याआधी देखील तिच्या अनेक गाण्यांना चाहत्यांनी पसंती दर्शवली. आता ती 'स्ट्रीट डान्सर ३डी'च्या माध्यमाधून आपल्या नृत्याचा जलवा पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

'स्ट्रीट डान्सर ३ डी' (Street Dancer 3D) चित्रपटामध्ये वरूण आणि नोरा शिवाय अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात ती पाकिस्तानी डान्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे.   

त्याचप्रमाणे 'एबीसीडी'च्या दोन्ही भागातले नृत्य कलाकार आपल्या कौशल्याने चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. २४ जानेवारी २०२० रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.