नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसचा सर्वांसमोर रोमान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

नोरा फतेही ही अशी एक स्टार आहे जिने आपल्या डान्सने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे

Updated: Aug 17, 2021, 09:13 PM IST
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसचा सर्वांसमोर रोमान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल title=

मुंबई : नोरा फतेही ही अशी एक स्टार आहे जिने आपल्या डान्सने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजकाल ती तिच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. नोरा फतेही तिच्या डान्सबरोबरच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. 

नोराचे नवीन ते जुने व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होतात. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ देशातील टॉप डान्स रिअॅलिटी शोच्या मंचावरचा आहे. ज्यामध्ये ती टेरेन्स लुईससोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.

टेरेन्स लुईस बरोबर डान्स
नोरा फतेहीच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा पाहायला आवडतो. व्हिडीओमध्ये ती 1974च्या 'अजनबी' चित्रपटातील राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्या 'भिगी-भिगी रातों में' या लोकप्रिय गाण्यावर टेरेंस लुईससोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. 

निळ्या रंगाची साडी आणि टेरेन्सचा काळा सूट या गाण्यावर परिपूर्ण जुळल्यासारखं दिसतं. व्हिडिओच्या सुरुवातीला जज गीता कपूर देखील या दोघांचं कौतुक करताना दिसत आहेत. नोरा फतेही आणि टेरेन्सच्या केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकप्रिय चेहरा नोरा फतेही 
नोरा फतेही अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली आहे. चाहतेही तिची आतुरतेने वाट पाहतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. नोरा ने 'दिलबर' आणि 'गर्मी' सारख्या उत्तम गाण्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच नोरा फतेहीचे 'छोड देंगे' आणि 'गुरू रंधावा' सोबत 'नच मेरी रानी' ही गाणी रिलीज झाली ज्याला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे.