Nora Fatehiचा मित्रासोबत बेली डान्स; तुमचेही पाय थिरकतील

जेव्हा नोरा मित्रासोबत बेली डान्सवर थिरकते...

Updated: Jul 20, 2021, 11:00 AM IST
Nora Fatehiचा मित्रासोबत  बेली डान्स; तुमचेही पाय थिरकतील title=

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीने कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नोरा आज तिच्या अभिनयामुळे तर ओळखली जातेचं पण तिचा डान्स आणि अदा चाहत्यांना घायाळ करतात. आता देखील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोरा तिच्या मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहे.  व्हिडिओमध्ये नोरा बेली डान्स करतना दिसत आहे. नोराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'ऑफिसमध्ये दुसरा दिवस' असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 42 लाख लोकांनी पाहिला आहे. शिवाय तिच्या या डान्स व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्टचा वर्षव होत आहे.