नोरा फतेहीने अनुभवले भयानक क्षण, 'त्या एका गोष्टीमुळे श्वास कोंडला आणि...'

नोराच्या यशस्वी करियर दरम्यान घडली अशी घटना, ज्यामुळे तिने अनुभवले भयानक क्षण  

Updated: Nov 17, 2021, 11:09 AM IST
नोरा फतेहीने अनुभवले भयानक क्षण, 'त्या एका गोष्टीमुळे श्वास कोंडला आणि...' title=

मुंबई : अभिनेत्री आणि डान्सर  नोरा फतेहीने (Nora Fatehi) फार कमी काळात चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. 'दिलबर' गर्ल नोराने अनेक आयटम सॉन्गमध्ये भन्नाच डान्स करत चाहते आणि डान्स प्रेमींना घायाळ केलं. आता सध्या तिचं नवं गाणं तुफान व्हायरल होत आहे. पण नव्या गाण्यादरम्यान नोराला अनेक वाईट क्षणांचा सामना करावा लागला. या वाईट क्षणांचा खुलासा खुद्द नोराने केला आहे.  

नोरा फतेहीने सांगितले की, 'सत्यमेव जयते 2' या आगामी चित्रपटातील 'कुसु कुसु' गाण्यावर ती आतापर्यंतच्या सर्वात वाईट अनुभवातून गेली आहे. सेटवर तिच्या ड्रेसमुळे नोराचा श्वास कोंडत होता. ती म्हणाली हा तिचा सर्वात वाईट अनुभव होता. गाण्यात नोराच्या बॉडीसूटला जोडलेली ओढणी तिच्या गळ्यात अडकत होती. 

जड ओढणीच्या वजनामुळे नोराच्या गळ्यात हार अडकला, त्यामुळे तिचा श्वास कोंडला त्याचप्रमाणे तिच्या मानेवर अनेक जखमा देखील झाल्या. अनुभवाविषयी सांगताना नोरा म्हणाली की, सेटवर अनेकदा गुडघे जखमी होणं, रक्ताळलेले पाय यासारख्या किरकोळ घटना घडतात, पण सेटवर हा माझा सर्वात वाईट अनुभव होता. ओढणी जड असल्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आला आणि माझ्या शरीरावर अनेक जखमा देखील झाल्या. 

नोरा पुढे म्हणाली की, 'असे वाटले की कोणीतरी माझी मान दोरीने बांधली आणि मला जमिनीवर ओढले, पण आमच्याकडे शूटिंगसाठी कमी वेळ होता, म्हणून मी गाणे चित्रित करणे आणि टेक पूर्ण करणे सुरू ठेवले. त्यानंतर ब्रेक घेतला.' 

मिलन मिलाप झवेरी दिग्दर्शित, 'सत्यमेव जयते 2' चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.