नोरा फतेहीच्या फोटोचा सोशल मीडियावर हंगामा, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Updated: Jan 15, 2022, 09:50 PM IST
नोरा फतेहीच्या फोटोचा सोशल मीडियावर हंगामा, फोटो व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिचा डान्स लोकांना आकर्षित करतो, तर कधी नोराची स्टायलिश लोकांना खूप आवडते. अशा परिस्थितीत, ती पुन्हा एकदा तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे. जी तिने नुकतीच चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
नोरा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रोफेशनल लाईफपासून ते तिच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत, ती चाहत्यांसोबत तिच्या झलक शेअर करत असते. यावेळी ती तिच्या लेटेस्ट लूकमुळे चर्चेत आहे. यामध्ये ती जांभळ्या कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. यासोबत तिने गुलाबी रंगाची हँडबॅग घेतली असून या लूकवर तिने सिंपल हेअर स्टाईली आहे.

हॉट दिसत आहे नोरा
नोराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे आणि गळ्यात छोटा नेकपीस घातला आहे. यासोबतच तिने काळा सनग्लासही लावला आहे. या लूकमध्ये नोरा खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलीकडेच गुरू रंधवाच्या 'डान्स मेरी रानी' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. या गाण्यातही नोराने आपल्या मनमोहक एक्सप्रेशनसोबतच आपल्या डान्सनेही प्रेक्षकांची मने जिंकली. नोराचं हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं होतं.