नोराला भेटला तिच्या स्वप्नांचा राजकुमार... फोटोमध्ये दोघे दिसतायेत रोमांटिक

नोरासोबत फोटोमध्ये दिसणारा हा खास व्यक्ती नक्की आहे तरी कोण?   

Updated: Dec 12, 2021, 12:15 PM IST
नोराला भेटला तिच्या स्वप्नांचा राजकुमार... फोटोमध्ये दोघे दिसतायेत रोमांटिक title=

मुंबई : बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नोरा फतेहीने आज भारतात आपलं नाव कमावलं आहे. नोरा तिच्या आयटम साँग्समुळे बरीच प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर ती कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नोरा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते. पण आता मात्र नोरा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 

सध्या नोराचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ती समुद्र किनारी मजा घेताना दिसत आहे. पण चाहत्यांचं लक्ष आहे, तिच्यासोबत असलेल्या खास व्यक्तीकडे. फोटोमध्ये नोरासोबत प्रसिद्ध बॉलिवूड गायक गुरु रंधावा दिसत आहे.  नोरा आणि गुरु रंधावा समुद्र किनारी एकत्र आनंद लुटना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोरा आणि गुरु रंधावाला एकत्र पाहुन चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी नोरा आणि गुरु रंधावा एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. सध्या दोघांचे फोटो चर्चांना दुजोरा देत आहेत. 

नोराची कारकीर्द
नोराने बॉलिवूडमध्ये तसंच कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्ये बरेच काम केलं आहे. नोराच्या सुरुवातीच्या काळात, तिला काम करण्यात खूप अडचण होती मात्र तिने कधीही हार मानली नाही आणि नेहमीच या कामासाठी कठोर परिश्रम घेतले. 

नोराच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक भाऊ आहे. आपल्या आयटम साँग्समुळे तिने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. ज्यामुळे ती आज खूप लोकप्रिय आहे.