'आता मलाचं दयाबेन व्हावं लागेल...' दयाबेनच्या एन्ट्रीवर निर्मात्यांचं वक्तव्य

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गोकूळ धाम सोसायटीमुळे कायम चर्चेत असते.

Updated: May 3, 2021, 01:33 PM IST
'आता मलाचं दयाबेन व्हावं लागेल...' दयाबेनच्या एन्ट्रीवर निर्मात्यांचं वक्तव्य

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गोकूळ धाम सोसायटीमुळे कायम चर्चेत असते. 'तारक मेहता..' मालिकेचे चाहते कायम दोन प्रश्न विचारत असतात. पहिला प्रश्न म्हणजे मालिकेत दयाबेनची एन्ट्री कधी होणार? दुसरा प्रश्न म्हणजे पोपटलालचं लग्न कधी होणार? पोपटलालच्या लग्नाचं तर सांगता येणार नाही. पण दयाबेनची एन्ट्री मालिकेत लवकरचं होणार असल्याची चर्चा  जोरदार रंगत आहे. 

मालिकेत दिशा परत येणार की नाही? याबद्दल  दिशाने अद्याप सांगितलं नाही. नुकताचं एका मुलाखतीत निर्माते असित मोदी यांना दयाबेन कधी परतणार असा प्रश्न विचारण्यात आलाा. तेव्हा मोदी म्हणाले, 'मला आता असं वाटतं आहे, की मीच दयाबेन म्हणून काम करावं. हा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून विचारला जात आहे'

असित यांनी आम्ही दिशाची प्रतीक्षा करत आहोत असं देखील सांगितलं. 'जर दिशाने मालिका सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तर आम्ही नव्या दयाबेनसोबत  मालिकेला नव्याने सुरूवात करू. मला असं वाटतं सध्या दया आणि पोपटलालचं लग्न हे महत्त्वाचं आहे. बाहेर सर्वत्र संकट आहे. त्यामुळे मला असं वाटतं बाकी गोष्टींचा आपण सावकाश विचार करू शकतो.' 

2008 पासून सुरु आहे मालिका
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही सोनी सब चॅनलवर चालणारी लोकप्रिय मालिका आहे.   जुलै 2008 मध्ये प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तेव्हापासून टीव्हीवर  सुरु आहे.  ही मालिका 'दुनिया ने ऊंधा चश्मा' या साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे.