अक्षय कुमारसोबत दिसणार 'या' अभिनेत्रीची बहिण

शेअर केली भावनिक पोस्ट 

Updated: Sep 23, 2019, 11:24 AM IST
अक्षय कुमारसोबत दिसणार 'या' अभिनेत्रीची बहिण

मुंबई : सिनेमांतून लाखो प्रेक्षकवर्ग तयार केल्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमार आपल्याला एका म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. नुकतंच अक्षयने या म्युझिक व्हिडिओचं शुटिंग संपवलं आहे. या म्युझिक व्हिडिओत अक्षय कुमारसोबत एका अभिनेत्रीची बहिण दिसणार आहे. गाण्यातील या अभिनेत्रीने अक्षयसोबत काम केल्याचा आनंद एका भावनिक पोस्टमधून सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Image result for akshay kumar zee news

अभिनेत्री कृती सेननची बहिण नुपूर सेनन या व्हिडिओत अक्षयसोबत दिसणार आहे. नुपूर अभिनेत्री असून ती गायिका देखील आहे. या दोघांनी गायक बी प्राककरता शुटिंग केलं आहे. 'फिलहाल' असं या गाण्याचं नाव असून बी प्राकने अक्षयच्या 'केसरी' सिनेमातील 'तेरी मिट्टी' या गाण्याला आवाज दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

From being his fan to being blessed to be his co-star...what a magical feeling! Couldn’t have asked for a better start than being paired opposite my favourite @akshaykumar ..sir.. you’ve been so warm to me, cracked me up (even during emotional scenes and just made me feel super comfortable with your dilli wali Punjabi. Thank you for being so so amazing! Something really really special I’ve worked on..

A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on

अक्षयसोबतचा अनुभव शेअर करताना नुपूर सांगते की, माझ्यासाठी हा अनुभव एखाद्या जादूप्रमाणेच आहे. याहून चांगली सुरूवात काय असू शकते. अक्षय सरांसोबत काम करण्याची संधी ही अतिशय चांगली असून तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं नुपूर सांगते.

फक्त नुपूरनेच नाही तर गायक बी प्राकने देखील अक्षयचे आभार मानले आहे. त्याने लिहिलं आहे की, 2019 चं सर्वात मोठं 'फिलहाल' हे गाणं आहे. अक्षय पाजी तुम्हाला जितके धन्यवाद देवू तेवढे कमीच आहेत. 
नुपूर सेनन ही अभिनेत्री कृती सेननची बहिण असून ती गायिका देखील आहे. आतापर्यंत ती अनेक वेगवेगळ्या म्युझिक व्हिडिओत दिसली आहे. नुपूर लवकरच साजिद नाडियाडवालाच्या सिनेमातून बॉलिवूडमधून पदार्पण करणार आहे.