Dream Girl 2 मध्ये माझ्याएवजी अनन्या; Replacement वर खुलासा करत नुसरत म्हणाली, 'हे अन्यायकारक...'

Nushrratt Bharuccha on Dream Girl 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ड्रीम गर्ल 2, यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराना याची. त्याच्यासोबत अनन्या पांडेही दिसणार आहे. परंतु यावेळी नुसरत भरूचाचं वक्तव्य चर्चेत आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 19, 2023, 05:48 PM IST
Dream Girl 2 मध्ये माझ्याएवजी अनन्या; Replacement वर खुलासा करत नुसरत म्हणाली, 'हे अन्यायकारक...' title=
August 19, 2023 | nushrratt bharuccha reacts on not being casted for dream girl 2

Dream Girl 2 : 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा आला होता तेव्हा नूसरत भरूचा आणि आयुष्यमान खुराना हे दोघं यावेळी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले होते. आता अनन्या पांडे आणि आयुष्यमान खुराना यावेळी दिसणार आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यातून या चित्रपटाचे प्रमोशनही खूप चांगले होते आहे. यावेळी अनन्याच्या आईचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातून यावेळी पहिल्या चित्रपटाप्रमाणे आयुष्यमान खुरानाही स्त्रीवेशात दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आयुष्यमान खुरानाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्याच्या या नव्या लुकनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यातून आता फक्त चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या या आगळ्यावेगळ्या चित्रपटाची. 

अनेकदा असं होतं की पहिल्या चित्रपटाचा भाग गाजला की मग त्यानंतर त्या चित्रपटातील कलाकाराला दुसऱ्या भागात घेतलीच असं नाही. त्यातून त्या कलाकाराची प्रतिक्रिया मग सर्वच जण हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. सध्या अशाच एका प्रकाराची चर्चा आहे. यावेळी 'ड्रीम गर्ल 2'चीच चर्चा आहे. नुसरत भरूचा ही अभिनेत्री पहिल्या भागातून आपल्या समोर आली होती. तिच्या अभियनयाचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले होते. परंतु यावेळी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात मात्र ती दिसणार नाहीये. 

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती यावेळी म्हणाली आहे की, ''मी ड्रीम गर्लच्या पहिल्या भागाचा हिस्सा होते. मी आजही त्या संपुर्ण टीमच्या प्रेमात आहे.  त्यामुळे त्याच्यासोबत काम करणं हे मी आता मिस करते आहे. परंतु त्यांनी मला कास्ट का केले नाही या प्रश्नाचे उत्तर हे माझ्याकडे नाही तर या प्रश्नाचं उत्तर हे फक्त तेच देऊ शकतात. मला याबाबत काहीच माहिती नाही. याचं काहीच लॉजिकही नाही आहे. त्याचसोबत काहीच उत्तर नाहीये. पण हो मला का कास्ट केलं नाही? मी एक माणूस आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतो आहे त्यातून हे अन्यायकारकही वाटते आहे. पण मी समजते की हा त्यांचा निर्णय आहे. तर कूल, मला काहीच प्रोब्लेम नाही.'' असं ती म्हणाली आहे. 

सध्या या चित्रपटातून आगळावेगळा विषय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. अनन्या पांडेचा 'लायगर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर आयुष्यमानचा 'अनेक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.