Nusrat Jahan Controversies: Bold and the Beautiful ही दोन विशेषणे घेतली की एकच नाव तोंडावर येते ते म्हणजे नुसरत जहां(Nusrat Jahan). बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां ही तिच्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. लग्न, पासून ते प्रेग्नन्सीपर्यंत तिच्या वैयक्तीय आयुष्यात नेहमीच असं काही तरी घडत असतं की त्यामुळे नेहमीच तिच्याबाबत चर्चा रंगते. गरोदर असताना नवरा म्हणाला हे मूल माझं नाही यावरुन चांगलाच वादंग झाला होता. आज नुसरत जहांचा 33 वा वाढदिवस आहे(Nusrat Jahan Controversies).
नुसरत जहां ही भारतातील सर्वात ग्लॅमरस खासदार आहे. सोशल मीडियावर ती विविध फोटो शेअर करत असते. तिचे हटके फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असतात. कधी समुद्र किनाऱ्यावर, कधी जीममध्ये तर कधी स्वीमिंग पुलमधील फोटो नुसरत शेअर करत असते. नुसरत जितकं वेस्टर्न स्टाईलला फॉलो करते. तितकंच तिला देसी इंडियन लुकही आवडतो. यामुळेच कधी साडी तर कधी दुर्गा पूजेतील फोटो ति शेअर करते.
फिल्मी दुनियेत आपली वेगळी छाप पाडल्यानंतर नुसरत जहांने राजकारणात एन्ट्री केली. 2019 मध्ये नुसरत जहां लोकसभेवर निवडून आली. तृणमूल काँग्रेसने नुसरतला बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. तिने भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्बल साडेतीन लाखांच्या मताधिक्यासह पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्तीही नुसरत जहां या दोघींनी एकाचवेळी खासदारपदी निवडून आल्या. या दोघींनी संसदेबाहेर केलेले फोटोशूट राजकारणात चांगलंच गाजलं होतं. या दोघीही बंगाली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.
नुसरत जहांने 19 जून 2019 रोजी निखिल जैन या व्यावसायिकाशी हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. तुर्कीतील बोडरम शहरात त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर नवरात्रीतही तिने पारंपरिक हिंदू पोशाखात पूजा केल्यामुळे तिच्यावर टीका झाली होती.
लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांतर नुसरत आणि निखिल यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आला. दरम्यान, नुसरत गर्भवती असल्याचे वृत्त समोर आले. याविषयी काहीच माहित नाही असं म्हणत निखिलने हे मूल माझं नाही असा दावा केल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. सध्या नुसरत तिचा तथाकथित पती यशदास गुप्ता आणि मुलासोबत आनंदी आणि सुखी जीवन जगत आहे.