बिग बींच्या नातीशी रिलेशनशिपच्या चर्चा, सिद्धांत शेवटी म्हणालाच, हो मी...

 सिद्धांतच्या कामावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायेत

Updated: Feb 20, 2022, 02:47 PM IST
बिग बींच्या नातीशी रिलेशनशिपच्या चर्चा, सिद्धांत शेवटी म्हणालाच, हो मी...  title=

मुंबई : अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी  या दिवसांत त्याचा नुकताच रिलीज झालेला 'गेहराईया' सिनेमातून मिळालेल्या पॉप्यूलरिटीला एन्जॉय करत आहे. सिद्धांतच्या कामावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायेत.  क्रिटिक्स पासून ते प्रेक्षक सगळेच सिद्धांतच्या कामाचं कौतुक करत आहेत. खासकरुन तरुण मुलींमध्ये सिंद्धांची क्रेज निर्माण झाली आहे.  मात्र नुकतंच सिद्धांतने आपल्या पर्सनल लाईफला घेवून मोठं वक्तव्य केलं आहे.  सिद्धांतने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तो सिंगल नाहीये तर तो रिलेशनशिपमध्ये आहे. यावेळी तो बोलताना म्हणाला की,  त्याला अपल्या रिलेशनशिपबद्दल ओपन व्हायचं नाहीये. 

अभिनेत्याने सांगितलं की, त्याला त्याच्या कामावर एवढ फोकस व्हायचं आहे की, लोकं फक्त त्याच्या कामाबद्दल बोलतील आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा विचार करणार नाहीत. तसंच तो  पुढे म्हणाला, 'मी खूप लाजाळू आहे. मी सार्वजनिक ठिकाणी त्याचा हात धरू शकणार नाही. मी खूप साधा आहे. याआधी त्याचं अमिताभ बच्चन यांची लाडकी नात नव्या बच्चनसोबत नाव जोडलं होतं  त्यामुळे ती नव्याचं आहे का असा प्रश्नदेखील चाहत्यांना पडू लागलाय.

आपल्या नात्याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, 'मला माझा जोडीदार आणि नात्याबद्दल जगासमोर बोलणं आवडत नाही. मला काम करायला, टीव्हीवर काहीतरी छान बघायला, फिफा गेम्स खेळायला आणि ट्रव्हल करायला खूप आवडतं. मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगा आहे.  आता सिद्धांतच्या या गोष्टी ऐकून लाखो मुलींचं हार्टब्रेक होणार आहे. पण यासोबतच आता या अभिनेत्याचे चाहते त्याच्या जोडीदाराबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

सिद्धांतचं वर्कफ्रंट
सिद्धांतने 2019 मध्ये फिल्म गलीबॉयमधून अपल्या करिअरला सुरुवात केली. सिद्धांतचा 'फोनभूत' हा सिनेमा रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. या सिनेमात सिद्धांतसोबत कतरिना आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.