close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलग १०व्या दिवशी 'मिशन मंगल' चित्रपटाची दमदार कमाई

चित्रपटांच्या या काटे की टक्करमध्ये अभिनेता अक्षय कुमारचं मिशन यशस्वी ठरल्याचं दिसत आहे.

Updated: Aug 25, 2019, 07:25 PM IST
सलग १०व्या दिवशी 'मिशन मंगल' चित्रपटाची दमदार कमाई

मुंबई : 'मिशन मंगल','बाटला हाऊस' एकाच दिवशी चित्रपटगृहात धडकल्यामुळे कोणाता चित्रपट बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. चित्रपटांच्या या काटे की टक्करमध्ये अभिनेता अक्षय कुमारचं मिशन यशस्वी ठरल्याचं दिसत आहे. स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेल्या 'मिशन मंगल'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून चित्रपटाने सलग १०व्या दिवशी जवळपास १३.३२ कोटी रूपयांचा जमा केला आहे. म्हणजेच चित्रपटाने आतापर्यंत १४९.३१ कोटींपर्यंत मजल मारली आहे. 

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे चित्रपटाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. सतत चढत्या क्रमावर असलेला अक्षयचा 'मिशन मंगल' चित्रपट येत्या काळात किती कोटींचा गल्ला जमा करेल हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.  

मिशन मंगल चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केलंय. अक्षय कुमारसह चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी, नित्या मेनन, संजय कपूर आणि जीशान अयूब यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

चित्रपटात अक्षय संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहे. इतिहासच्या पानांत सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या देशाचा प्रेरणादायी अंतराळ प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.