close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'माझ्या पश्चात संपूर्ण संपत्ती अभिषेकची नाही', बिग बींचा खुलासा

बॉलिवूडचे महानायक जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन भारत देशातील सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्यांपैकी एक आहेत.

Updated: Aug 25, 2019, 06:28 PM IST
'माझ्या पश्चात संपूर्ण संपत्ती अभिषेकची नाही', बिग बींचा खुलासा

मुंबई : बॉलिवूडचे महानायक जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन भारत देशातील सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्यांपैकी एक आहेत. अशात त्यांचा महागडा बंगला त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण संपत्ती जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा वारसदार कोण असेल यासंबंधीच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगताना दिसत आहेत. वडिलांच्या संपूर्ण संपत्तीवर मुलाचा हक्क असतो. परंतू त्यांच्या संपत्तीवर एकट्या मुलाचा म्हणजे फक्त अभिषेकचा हक्क नाही. 

नुकताच झालेल्या एका रिअॅलिटी शोच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या संपत्ती बद्दल मोठा खुलासा केला. ते त्यांची संपत्ती फक्त अभिषेकला देणार नाहीत, तर त्यांच्या संपत्तीमध्ये वाटे होणार आहेत. माझ्या पश्चात संपत्तीची वाटणी करण्यात येईल. यासंबंधीत बोलताना ते म्हणाले की, 

'माझ्या पश्चात माझ्याकडे जे काही आहे त्याचे दोन वाटे करण्यात येतील. माझा एक मुलगा आहे आणि एक मुलगी. दोघांमध्ये संपत्तीचे समान वाटे करण्यात येतील.' म्हणजेच, बिग बी मुलगा अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा या दोघांमध्ये त्यांच्या संपत्तीचे समान वाटे करणार आहेत.