प्रियांका चोप्राच्या पॅरिस फोटोचं पती निक जोनसने केलं असं वर्णन

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा नुकतीच ग्लोबल सिटीझन लाईव्ह इव्हेंटमध्ये उपस्थित राहिली 

Updated: Sep 26, 2021, 03:03 PM IST
प्रियांका चोप्राच्या पॅरिस फोटोचं पती निक जोनसने केलं असं वर्णन

मुंबई : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा नुकतीच ग्लोबल सिटीझन लाईव्ह इव्हेंटमध्ये उपस्थित राहिली आणि शो होस्ट केला. फ्रान्सच्या पॅरिस या सुंदर शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पॅरिसला पोहोचलेल्या प्रियांकाने इथून स्वतःसाठी आठवणींचा अल्बम गोळा केला. आयफेल टॉवरसमोर उभे राहून तिने आपले फोटो शेअर केले.

प्रियांकाने हा फोटो शर्मिला टागोर आणि राज कपूरच्या चित्रपटाच्या नावाने शेअर केला - 'एन इव्हिनिंग इन पॅरिस ...'. आयफेल टॉवरची मोहकता, आल्हाददायक हवामान आणि निळ्या ड्रेसमध्ये प्रियांकाची ग्लॅमर अशी  पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपल्याला सांगू की प्रियांकाने या कार्यक्रमात न्यूयॉर्कस्थित डिझायनर प्रबल गुरुंग यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. पृथ्वी थीम असलेल्या निळ्या ड्रेसमध्ये प्रियांका ग्लॅमरस दिसत होती.