वेब सीरिज पाहण्यासाठी ऑफिसला सुट्टी; नेटकरी म्हणतात Vacancy आहे का?

लोकप्रिय वेब सिरीजमध्ये जर कोणत्या सिरिजचं नाव पहिल्या क्रमांकावर आलं असेल तर ते म्हणजे  'मनी हाइस्ट' (Money Heist) .

Updated: Aug 31, 2021, 06:54 PM IST
वेब सीरिज पाहण्यासाठी ऑफिसला सुट्टी; नेटकरी म्हणतात Vacancy आहे का?  title=

मुंबई : लोकप्रिय वेब सिरीजमध्ये जर कोणत्या सिरिजचं नाव पहिल्या क्रमांकावर आलं असेल तर ते म्हणजे  'मनी हाइस्ट' (Money Heist) . या वेब सिरीजबद्दल संपूर्ण जगात क्रेझ आहे. आपल्या देशात, काही बॉलिवूड स्टार्सनी 'मनी हाइस्ट' (Money Heist) च्या थीमवर एक गाणं लाँच केलं होतं, जे खूप लोकप्रिय झालं. आता पुन्हा एकदा ही वेब सिरीज धमाल करण्यासाठी येत आहे.

वेब सीरिज 3 सप्टेंबरला येणार आहे
नेटफ्लिक्सची सगळ्यात लोकप्रिय वेब सिरीज 'मनी हाइस्ट' (Money Heist)चा पाचवा सीझन लवकरच येत आहे. चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. हा या वेब शोचा शेवटचा सीझन असणार आहे. प्रेक्षक याबद्दल खूप उत्सुक आहेत. वेब सीरिजचा शेवटचा सीझन 3 सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जाईल.

जयपूरच्या कंपनीने दिली सुट्टी 
या वेब सिरीजच्या क्रेझची गोष्ट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. अलीकडेच, जयपूरमधील एका कंपनीने आपल्या कंपनीतील सगळ्या कर्मचाऱ्यांना 'मनी हाइस्ट' (Money Heist)' पाहण्यासाठी एक दिवस सुट्टी जाहीर केली आहे. जयपूरमधील फर्म वर्वे लॉजिक या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 3 सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. त्याच दिवशी शो प्रसारित केल्याच्या आनंदात, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 'नेटफ्लिक्स आणि चिल हॉलिडे' च्या स्वरूपात सुट्टी जाहीर केली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जैन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रजा देण्याविषयी सांगितलं आहे. यासोबत, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक जैन यांनी देखील कोविड -19 महामारी दरम्यान केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात, व्हेर्व लॉजिक सीईओ म्हणाले की 'थोड्या वेळासाठी ब्रेक घेणं ठीक आहे'.

काय आहे मनी हाइस्ट
'मनी हाइस्ट ही एक अशी स्पॅनिश वेब सिरिज आहे ज्याने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. ओटीटी जगातील प्रत्येक चाहत्याला प्रोफेसर आणि 'बेला सियाओ' चांगले माहीत असतीलच. 'मनी हाइस्ट 'चा 5 वा सीझन दोन भागात रिलीज होईल.पहिला भाग पुढच्या महिन्यात 3 सप्टेंबरला रिलीज होणार आहे, तर दुसरा भाग 3 डिसेंबर 2021 रोजी म्हणजेच 3 महिन्यांनी रिलीज होणार आहे. यापूर्वी 4 सीझन रिलीज झाले आहेत आणि चारही सीझन प्रचंड हिट झाले.