नवी दिल्ली: ब्रिटीश दिग्दर्शक मायकेल अँडरसन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८व्या वर्षी वँकूवर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अँडरसन यांना 'अराऊंड द वर्ल्ड इन 80 डेज' आणि 'लोगन्स रन' या चित्रपटांसाठी ऑस्करचे नामांकीत केरण्यात आले आहे.
दरम्यान, अँडरसन यांच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ने हॉलिवुडरिपोर्टर.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, अँडरसन यांचे बुधवारी निधन झाले. अँडरसन यांची दोन्ही मुले ज्यूनिअर आणि डेव्हीड अँडरसन हे चित्रपटसृष्टीशीच संबंधीत आहेत. तर, त्यांची सावत्र मुलगी लॉरी होल्डन हिसुद्धा 'द वॉकिंग डेड' आणि 'द शील्ड्स' सारख्या टीव्ही सीरियल्समधून पडद्यावर आली आहे.
दरम्यान, अँडरसन यांचे डायरेक्टेड बाय हे आत्मचरित्र प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. लवकरच ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.