OSCARS 2019 : चित्रपट कलेचा गौरव करत दिमाखात पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा

And the Oscar goes to......  

Updated: Feb 25, 2019, 10:48 AM IST
OSCARS 2019 : चित्रपट कलेचा गौरव करत दिमाखात पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा title=

लॉस एंजेलिस : OSCAR 2019 कला आणि विशेषत: सिनेजगतात प्रचंड लोकप्रिय आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची रंगत आता क्षणाक्षणाला वाढतच आहे. मोठ्या दिमाखात या सोहळ्याच्या रेड कार्पेटची सुरुवात झाली असून हॉलिवूडमधील कलाकार मंडळींची उपस्थिती पाहायला मिळत आहे.  ऑस्करच्या रेड कार्पेटवर आणि एकंदरच या सोहळ्याला येण्याचा आनंद या कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तर, मोठमोठ्या सेलिब्रिटी फॅशन डिझायनरच्या अफलातून डिझाईन्सही या सोहळ्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही झगमगाटाची दुनिया साऱ्या जगाचं लक्ष वेधत आहे.

ऑस्करचं यंदाचं हे ९१ वं वर्ष आहे. त्यामुळे त्या अनुशंगाने आता या सोनेरी आणि मानाच्या बाहुलीची पाऊलं शंभरीकडे वळत आहेत असंच म्हणावं लागेल. २०१९ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत 'द फेव्हरिट' आणि 'रोमा' या चित्रपटांना सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी दहा नामांकंनं मिळाली आहेत. त्यामुळे आता कोणाच्या नावावर कोणता पुरस्कार जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.

-एकूण पाच नामांकनं मिळवणारा 'ग्रीन बुक' हा चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट.

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या यंदाच्या ऑस्करवर अल्फोन्सो क्युअरॉन यांचं नाव. 'रोमा' या चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार.

 And the #Oscars winner is... pic.twitter.com/QaZJB9CkRs

- ओलिविया कोलमन ही ठरली यंदाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. 'द फेव्हरेट' या चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार. 

 

- यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागातील पुरस्कारावर रामी मालेक (बोहेमियन रॅपसडी)चं नाव कोरलं गेलं आहे.

 

-तर, 'अ स्टार इज बॉर्न' या चित्रपटातील 'शॅलो'ला मिळाला सर्वोत्कृष्ट संगीताचा ऑस्कर 

- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत या विभागातील ऑस्करवर कोरलं लुडविग गोरान्ससन (ब्लॅक पँथर)चं नाव 

- सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) या विभागातील ऑस्करवर 'ब्लॅककेकेकेन्समन' चं नाव 

-सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) या विभागात 'ग्रीन बुक'ला मिळाला यंदाचा ऑस्कर

-सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन लघुपट

- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट या पुरस्कारावर 'फर्स्ट मॅन'ची बाजी 

-सर्वोत्कृष्ट लघुपट Best documentary short subject या विभागातील ऑस्कर 'पिरियड. एंड ऑफ सेंटेंस'च्या खात्यात 

-'बाओ' ठकला सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट

- 'स्पायडर मॅन : इनटू द स्पायडर वर्स' ठरला सर्वोत्कृष्ट ऍनिमेडेट फिचर फिल्म 

-सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता या विभागातील ऑस्कर मिळवण्यात महेर्शाला अली (द ग्रीन बुक) यशस्वी ठरला. त्याने हा पुरस्कार त्याच्या आजीला समर्पित केला.   

-सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा ऑस्करही 'बोहेमियन रॅपसडी'च्या पदरी.

- परभाषीय चित्रपटांच्या शर्यतीत ऑस्कर मिळवत बाजी मारली आहे, 'रोमा' या चित्रपटाने. मेक्सिकोतून ऑस्करसाठीचं नामांकन मिळणारा हा नववा चित्रपट आहे 

- सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण, अर्थात साऊंड मिक्सिंग या विभागातील पुरस्कार 'बोहेमियन रॅपसडी' या चित्रपटाला मिळाला आहे. .

- सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन या विभातील पुरस्कार जॉन वॉरहर्स्ट आणि निना हार्टस्टोन (बोहेमियन रॅपसडी) यांना मिळाला. 

- सर्वोत्कृष्ट छायांकन या विभागातील पुरस्कारांमध्ये बाजी मारली 'रोमा' या चित्रपटाने.

- सर्वोत्कृष्ट वेशभूषा या विभागातील यंदाचा ऑस्कर मिळाला 'ब्लॅक पँथर' या चित्रपटाला. 

-सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषेसाठीचा ऑस्कर 'वाईस'ने मिळवला. 

- सर्वोत्कृष्ट लघूपट (Best documentary feature nominees) या विभागातील ऑस्करवर 'फ्री सोलो'चं नाव कोरण्यात आलं. 

- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीच्या पुरस्काराने ऑस्करची सुरुवात. या पुरस्काराची मानकरी ठरली रेजिना किंग (इफ बेल स्ट्रीट कुड टॉक). हे तिचं पहिलं ऑस्कर नामांकन ठरलं आहे.