'आमचा घटस्फोट...' अंकिता लोखंडे आणि पतीमध्ये वादानंतर धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 

Updated: Jan 2, 2024, 08:39 PM IST
'आमचा घटस्फोट...' अंकिता लोखंडे आणि पतीमध्ये वादानंतर धक्कादायक खुलासा title=

मुंबई : ‘बिग बॉस 17’चा लेटेस्ट एपिसोडमध्ये विक्की जैन आणि अंकिता लोखंडेमध्ये पुन्हा एकदा वाद-विवाद पहायला मिळाला. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता मुनव्वर फारुकीसाठी विकीसोबत भांडताना दिसत आहे. या एपिसोडमध्ये एक बनावट कोर्टरुम दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये अंकिता मुनव्वरच्या बाजूने भांडत होती तर विक्की त्याला प्रश्न विचारत होता.  आयशा खानबाबत मॉक ट्रायल सुरू होती.  वादादरम्यान अंकिताचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि विकीला मागे जायला सांगितलं. तिने विकीला घटस्फोट देण्याचीही धमकी दिली होती. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन भांडण करताना दिसत आहे. यानंतर बिग बॉसचा आवाज येतो. बिग बॉस मध्यस्थी करत विकीला बोलायला सांगतात. त्याला खेळू द्या असं बिग बॉस सांगतात. यानंतर विकी बिग बॉसचे आभार मानतो आणि टास्क सुरु ठेवतो. 

विक्की जैनने अंकिता लोखंडेला चिडवत म्हटलं, ''बिग बॉस म्हणतायेत, तुझा खेळ खेळायला सुरु कर.'' जेव्हा बिग बॉसने विकीला मुनव्वरशी चर्चा सुरु ठेवण्यास सांगितली तेव्हा मात्र विकीने अंकिताला  त्रास देणे सुरूच ठेवलं.

 अंकिता लोखंडेने विक्की जैनला दिली घटस्फोटाची धमकी
यानंतर अंकिता लोखंडेला राग येतो. यानंतर ती विक्कीला म्हणते, तु माझ्यासोबत असं करु नकोस, कारण या सगळ्यावरुन आपल्यातच वाद नको व्हायला. आपलीच डिवोर्स केस सुरु नको व्हायला. अंकिताच्या या गोष्टी सगळ्याच कंटेस्टंटला त्रास देतात. मन्नारा चोप्रादेखील हैराण होते आणि अंकिताला म्हणते, तु जरा आता जास्तच बोलतेस. अंकिता तिचं ऐकून न ऐकल्यासारखी वागू लागते. 

अंकिताने पुन्हा एकदा विकी जैनला दिली घटस्फोटाची धमकी
यावेळी पहिल्यांदाच असं झालं नाही की, अंकिताने घटस्फोटाचा मुद्दा उचलून धरला. मागच्या आठवड्यातही अंकिताने विकीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. हे सगळं तेव्हापर्यंत सुरु झालं, जेव्हा आयशा खानने विक्कीला  त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारलं, ज्यावर विकीने अंकिताचा अपमान केला आणि विवाहित पुरुषाच्या त्रासाबद्दल बोलला ज्यामुळे अंकिता खूप दुखावली गेली होती.  

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.