धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नीला मारहाण; व्हायरल फोटोमुळे सत्य आलं समोर

अभिनेता त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 

Updated: Oct 25, 2022, 09:04 PM IST
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नीला मारहाण; व्हायरल फोटोमुळे सत्य आलं समोर title=

मुंबई : पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणा आणि लोकप्रिय अभिनेता फिरोज खान त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. फिरोज खानने लग्नाच्या 4 वर्षानंतर पत्नीसोबत विभक्त होण्याची घोषणा केली. विभक्त झाल्यापासून फिरोज खानची पत्नी अभिनेत्यावर गंभीर आरोप करत होती आणि आता तिने फिरोज खानचा खरा चेहरा जगाला दाखवला आहे.

फिरोज खान पत्नीला मारहाण करायचा
फिरोज खान आणि त्याची पत्नी अलिजा यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आता अलीजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अलीजा जखमी दिसत आहे. अलिजाच्या फोटोंमध्ये तिच्या शरीरावरील जखमा स्पष्ट दिसत आहेत. अलीजाच्या हातावर जखमेच्या खोल खुणाही दिसत आहेत. तिचे डोळेही सुजलेले दिसत आहेत. अलिजाच्या जखमी अवस्थेतील फोटो पाहून कोणाचंही हृदय हेलावू शकतं.

अलिझाच्या शरीरावर दिसणारी प्रत्येक जखमेची खूण पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानने आपल्या पत्नीला किती निर्दयीपणे मारहाण केली याची साक्ष देत आहे. फिरोज खान पडद्यावर भलेही हिरो असेल, पण खऱ्या आयुष्यात तो सैतानपेक्षा कमी नाही असं लोकं कमेंट बॉक्समध्ये म्हणताना दिसत आहेत. अलीजाच्या जखमेचा फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोक फिरोज खानला प्रचंड ट्रोल करत आहेत आणि पत्नीसोबत मारहाण केल्याबद्दल त्याची निंदा करत आहेत.

काही काळापूर्वी फिरोज खानच्या पत्नीने सोशल मीडियावर खुले पत्र लिहून अभिनेत्याचा पर्दाफाश केला होता. तिने लिहिलं की, लग्नाची चार वर्षे अडचणींनी भरलेली होती. सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे मला माझ्या पतीच्या हातून धोका, ब्लॅकमेलिंग आणि अपमान सहन करावा लागला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी ठरवलं आहे की मी माझं संपूर्ण आयुष्य अशा भीतीने जगू शकत नाही. हा निर्णय घेण्या मागचं एक मोठं कारण म्हणजे माझ्या मुलांचं सुख आणि चांगलं आरोग्य. त्याने विषारी, अस्वस्थ आणि हिंसक घरात राहून मोठा व्हावा असं मला वाटत नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फिरोज खानच्या विरोधात चाहते आणि सेलिब्रिटी
फिरोज खान हा पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार मानला जातो. तो मुख्यतः नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. फिरोजने पाकिस्तानातील अनेक मालिकांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. इश्किया, दिल क्या करे, रोमियो वेड्स हीर, वो एक पल यासह अनेक शोमध्ये दमदार काम करून त्याने अभिनय विश्वात आपले नाव कमावले आहे. मात्र जेव्हापासून फिरोज खानच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचार, मारहाणीचा आरोप केला आहे. तेव्हापासून चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण फिरोजच्या विरोधात गेले आहेत.