श्वेता तिवारीची लेक आणि सैफचा मुलगा इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये? समोर आला व्हिडीओ

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटींगच्या बातम्या येत आहेत. एकत्र अनेकदा हे दोघंही स्पॉट होतात. यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अनेक समोर आल्या आहेत.

Updated: Mar 10, 2024, 07:32 PM IST
श्वेता तिवारीची लेक आणि सैफचा मुलगा इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये? समोर आला व्हिडीओ title=

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या आईप्रमाणेच नेहमी चर्चेत असते. जरी पलकने बॉलिवूडला फारसे सिनेमा दिले नसले तरी ती सतत चर्चेत असते. मात्र तरिही ती तिच्या आईप्रमाणाचे अभिनयक्षेत्रात स्वत:चं करिअर बनवण्यासाठी सज्ज आहे. पलकने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून ती चर्चेत आहे.  तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. तिच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना खूप आवडतं. सोशल मीडियावर पलकचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मात्र पलकचा पुन्हा एकदा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये पलक पुन्हा एकदा इब्राहिम अली खानसोबत स्पॉट झाली आहे.  
 
पलक इब्राहिमसोबत झाली स्पॉट
पलक तिवारी यावेळी  इब्राहिम अली खानसोबत नाईट आऊटसाठी निघाली आहे. दोघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पलक आणि इब्राहिम एकाच कारमध्ये दिसत आहेत. यावेळी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम कार ड्राईव्ह करताना दिसतोय तर पलक त्याच्या बाजूच्या  सीटवर बसलेली दिसतेय.

लूकबद्दल बोलायचं झालं तर पलक तिवारीने ब्लॅक कलरचा टँक टॉप आणि ब्लॅक डेनिम परिधान केली आहे. ओपन हेअरमध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे. तर इब्राहिमने देखील  ब्लॅक टीशर्टमध्ये पलकसोबत ट्विनिंग केल्याचं दिसत आहे. दोघंही एकाच कारमधून उतरुन आतमध्ये वेग-वेगळे जाताना दिसतायेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटींगच्या बातम्या येत आहेत. एकत्र अनेकदा हे दोघंही स्पॉट होतात. यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अनेक समोर आल्या आहेत. दोघंही अनेकदा एकत्र सिनेमा बघायला जातात तर अनेकदा हे दोघं एकमेकांचे केवळ चांगले मित्र असल्याचंही बोललं जातं. मात्र असं असलं तरिही, इब्राहिम आणि पलककडून  यावर अद्यापतरी  कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पलक तिवारी किसी का भाई किसी की जान या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतूकही झालं होतं. याआधी पलक हार्डी संधूसोबत बिजली या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. तिचं हे गाणं सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं.