'आश्रम'मधील पम्मीच्या बोल्ड अवताराने चाहते घायाळ, शॉर्ट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर बोल्डनेसची हद्द पार

डिजिटलच्या दुनियेत विशेष स्थान मिळवलेली अभिनेत्री अदिती पोहनकर हिला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

Updated: Oct 8, 2022, 08:36 PM IST
'आश्रम'मधील पम्मीच्या बोल्ड अवताराने चाहते घायाळ, शॉर्ट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर बोल्डनेसची हद्द पार

मुंबई : डिजिटलच्या दुनियेत विशेष स्थान मिळवलेली अभिनेत्री अदिती पोहनकर हिला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. जबरदस्त कामगिरी आणि मेहनतीच्या जोरावरच तिने हे यश मिळवलं आहे. आदितीला ही लोकप्रियता 'आश्रम' या वेबसिरीजमुळे मिळाली. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही आज खूप मोठी झाली आहे.

अदिती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचा सुंदर आणि आकर्षक अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवून इंटरनेटचा पारा चढवला आहे. यावेळी अदितीने गोल्डन कलरचा डीप नेक आणि अतिशय शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे.

अदितीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी स्मोकी डस्की मेकअप केला आहे. या लूकला अजून आकर्षित बनवण्यासाठी अदितीने केस खुले ठेवले आहेत आणि कानात सोनेरी झुमके घातले आहेत. त्याचबरोबर, अभिनेत्रीने मॅचिंग हाय हील्स कॅरी केल्या आहेत. येथे अभिनेत्री कॅमेऱ्याकडे पाहताना स्टूलवर पोज देत आहे. या अवतारात अदिती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या स्टाइलवर चाहते फिदा झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आदितीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अनेक वेब शोमध्ये दिसली आहे. प्रत्येक वेळी या अभिनेत्रीचा नवा आणि वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. सध्या ती 'आश्रम 4' मुळे चर्चेत आहे. तिला पुन्हा एकदा पम्मीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x