October Heat मध्ये श्रीदेवीची लेक स्वेटर घालून फिरतेय; नेटकरी म्हणतात, 'बरी आहे ना ही?'

खुशी कपूर घरातून बाहेर पडताच तिच्या अवतीभोवती फोटोग्राफर्सची नुकतीच झुंबड उडाली होती 

Updated: Oct 8, 2022, 08:26 PM IST
October Heat मध्ये श्रीदेवीची लेक स्वेटर घालून फिरतेय; नेटकरी म्हणतात, 'बरी आहे ना ही?' title=

Janhavi Kapoor Spotted: सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती स्टार कीड्ची. पण त्यातून चर्चा आहे ती स्टार कीड्सच्या लुकची. बॉलीवूडमध्ये कोण कधी काय फॅशन करेल याचा काही नेम नाही त्यामुळे हे सेलिब्रेटी कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. नुकत्याच अशाच एका स्टार कीडच्या फॅशननं सगळ्याचंच लक्ष वेधलं आहे. तिचं नावं आहे खुशी कपूर. (bollywood actress khushi kapoor gym look goes viral netizens reacts)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर नुकतीच मुंबईत स्पॉट झाली, यावेळी खुशी कपूर कॅज्युअल लूकमध्ये दिसली. खुशी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वांच्या नजरा तिच्या लूककडे लागल्या आहेत. 

खुशी कपूर घरातून बाहेर पडताच तिच्या अवतीभोवती फोटोग्राफर्सची नुकतीच झुंबड उडाली होती आणि तिला पुर्णतः घेरून टाकले. यापुर्वीही अनेकदा खुशीसोबत असंच झाले आहे आणि यावेळी असेच काहीसे पाहायला मिळाले. खुशीनं यावेळी जीम लुक कॅरी केला होता परंतु तिचा जीम लुकपाहून नेटकऱ्यांनी तिची जोरदार खिल्ली उडवली आहे. 

खुशी कपूरने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचं जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. खुशी कपूर तिच्या आगामी द आर्चिज या चित्रपटाच्या तयारीत आहे. या चित्रपटातून खुशी कपूरसोबत अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा आणि शाहरूख खानची मुलगी सुहाना खान पदार्पण करते आहे. 

आश्चर्याची बाब म्हणजे भर उन्हाळ्यात, ऑक्टोबर हीटमध्ये खुशी कपूर चक्क स्वेटर घालून फिरताना दिसली. यासोबतच खुशी कपूरच्या हातात पाण्याची मोठी बाटली होती, ज्याचा अर्थच ती जीमला चालली असावी किंवा जीममधून बाहेर आलेली असावी. 

जान्हवी कपूरनंतर तिची धाकटी बहीण खुशी कपूरही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज ती तिच्या चाहत्यांसोबत एकापेक्षा एक बोल्ड आणि ब्यूटीफुल फोटो शेअर करत असते जे काही मिनिटातच व्हायरल होतात.