'पंचायत'चा हा अभिनेता करीना-सैफच्या वेडींग पार्टीत होता वेटर; आज सगळेच करतायत त्याची वाहवा

Panchayat Series : प्रत्येक यशस्वी माणसाचा प्रवास हा खडतर वाटेतून सुरु होत असतो. याला मनोरंजन विश्व देखील अपवाद नाही. 'पंचायत' फेम अभिनेत्याचा प्रवासही काहीसा असाच होता. 

Updated: Jun 11, 2024, 02:59 PM IST
'पंचायत'चा हा अभिनेता करीना-सैफच्या वेडींग पार्टीत होता वेटर; आज सगळेच करतायत त्याची वाहवा title=

Panchayat Series : शाहरुख पासून ते नवाजरुद्दीनपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी करिअरच्या सुरुवातीला असंख्य आव्हानं पार करत नाव प्रसिद्धी मिळवली. बरेचसे कलाकार हे मनोरंजन विश्वात येण्याआधी लहान- मोठी नोकरी करत होते. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या करिअरचा किस्सा सोशलमीडियावर चर्चेत आहे.मायानगरी मुंबईत आपली स्वप्नं घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो जण नाव प्रसिद्धी मिळावी यासाठी येतात. पडेल ते काम करत आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. सध्या ओटीटीवर चर्चेत असणाऱ्या 'पंचायत'मधील 'दामादजी'च्या भूमिकेत दिसणारा अभिनेतासुद्धा यापैकीच एक. आसिफ खाननंही बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी मेहनक केली. पण, या करिअरच्या आधी तो चक्क वेटर म्हणून हॉटेलमध्ये काम करत होता.

सध्या 'पंचायत'च्या सगळ्याच पर्वांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला असून , प्रेक्षकांनी या कलाकृतीला मोठी पसंती दिली आहे. या सीरिजच्या पहिल्या पर्वामध्ये आसिफने काहीशी नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने तिसऱ्या सिझनमध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे सध्या त्याचीच वाहवा होताना दिसत आहे.  हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आसिफने त्याच्या करिअर बाबतीतले अनेक रंजक किस्से सांगितले. तो म्हणाला की, त्याचा इथपर्यंत प्रवास सोपा नव्हता. लहानपणीच त्याच्या वडीलांचं निधन झाल्याने घर चालवण्यासाठी तो पडेल ते काम करत असे. अभिनयाची आवड असलेल्या आसिफने 2010 पासून करीयरची सुरुवात केली. खर्च भागवण्यासाठी आसिफ एका हॉटेलमध्ये वेटरचं काम सुरु केलं होतं. त्याचं काम पाहिल्यानंतर काही दिवसातच त्याला किचन डीपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुढे आसिफ म्हणतो की, तो काम करत असलेल्या हॉटेलमध्ये करीना आणि सैफ अली खानच्या लग्नाची पार्टी ठेवण्यात आली होती.

आसिफने त्यानंतर काही काळ मॉलमध्ये काम करत, छोट्या मोठ्या ऑडीशन दिल्या होत्या. त्यानंतर तो एका थिएटर ग्रुपला सामील झाला त्यानंतर त्याने कास्टिंग असिस्टंट म्हणून काम करत असताना 'टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘परी’, ‘पगलैट’ आणि ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ यासारख्या सिनेमात काम केलं. मात्र  2020 च्या 'जामतारा' सिरीजने त्याला खरी ओळख मिळवून दिली.‘पाताल लोक’ , ‘मिर्ज़ापुर’ आणि 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सीरिजमधून तो चर्चेच येऊ लागला. 'पंचायत'च्या यशानंतर आता आसिफ 'सेक्शन 108', 'काकुडा', 'नोरानी चेहरा', 'इश्क चकल्लास' आणि 'द वर्जिन ट्री' या त्याच्या आगामी सारिजमधून नव्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.