सोनाली विचारतेय,'राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?'

नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ 

Updated: Nov 23, 2021, 11:01 AM IST
सोनाली विचारतेय,'राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?' title=

मुंबई : सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदमचे धमाकेदार नव गाणं लाँच झालं आहे. 'केळेवाली' हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 'राया तुमच्या फॅमेलीत केळेवालीला घेणार का?' असे या गाण्याचे बोल आहेत. 

दिग्दर्शक विजू माने यांच्या 'पांडू' या सिनेमातील हे गाणं आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीची पसंती आहे. संपूर्ण चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि विनोदी अभिनेता भाऊ कदम यांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. सिनेमातील प्रत्येक गाणी सुपरहीट ठरत असून ‘केळेवाली’ या गाण्याला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.

या सिनेमातून 'पांडू' आणि 'महादू'ची जोडी प्रेक्षकांसमोर आणली आहे. ‘भाऊ कदम’ आपल्याला ‘पांडू’ च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके ‘महादू’च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.