Virla Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात एक तरुण खूप घाबरलेली दिसतंय. कारण ती कारमधून जात असताना तीन पुरुष बाईकवरुन तिचा पाठलाग करताना दिसत आहेत. महिलांना रात्री अपरात्री कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा देशात महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थितीत झालाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय घाबरलेली दिसतंय. ते तीन पुरुष बाइकवरुन तिचा पाठलाग करत असताना ती फोनवर कोणाशी तरी बोलतानाचा संवाद आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ती तरुणी अतिशय भीतीदायक परिस्थितीत असून बोलताना तिचा श्वास लागतोय. हा व्हिडीओ कोरमंगला, बेंगळुरूमधील असल्याचा म्हटलं जातंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही घटना मध्यरात्री 2 वाजता घडल्याच समजतं.
ती तरुणी कारमधून प्रवास करताना कोणाशी तरी फोनवर बोलताना तिच्यासोबत घडणाऱ्या घटनेबद्दल सांगतेय. ते माझ्या मागे येत आहे, तेवढं नाही तर त्यांनी अनेक वेळा कारला धडक दिली आहे. शिवाय ते शिवीगाळ करत आहेत, असं ती तरुणी म्हणालीय. ती फोनवर ती कुठल्या रस्त्यावरुन प्रवास करतेय, याचीही माहिती देत आहे. शिवाय ते पाठलाग करणाऱ्या पुरुषांचा बाइकचा क्रमांकही तिने समोरच्या व्यक्तीला फोनवर सांगत आहे.
तुम्ही पाहू शकता परिस्थिती अजून हाताबाहेर जातेय, ती सांगतेय की त्यांनी माझा रस्ता अडवला ते माझ्या वाहनासमोर आलेत. त्यानंतर आणखी भयावह म्हणजे ते शिवीगाळ करत त्यांनी कारचा दरवाजा उघडला. तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, घटनेची नेमकी तारीख हिंदुस्तान टाइम्सने स्वतंत्रपणे सत्यापित केलेली नाही.
अनेक वापरकर्त्यांनी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये आपली मतं मांडलीय. त्यांनी गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केलीय. अधिकाऱ्यांना महिलांसाठी कठोर सुरक्षा उपायांची खात्री करण्याची विनंती केली. मात्र, या व्हिडीओने एक दुसरी फळी पण निर्माण झाली आहे. काही नेटकरी यांनी व्हिडीओबद्दल शंका व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने म्हटलंय की, 'कोणीही यादृच्छिकपणे येऊन तुमच्या कारचा पाठलाग किंवा धडक मारणार नाही.. या मागची गोष्ट काय आहे.. रस्ता व्यस्त दिसत आहे, घाबरू नका.' दुसऱ्याने म्हटलंय की, 'बंगळुरू पोलिसांनी खरंच काही केलं का?... त्यांच्याकडे आता वाहनाचा क्रमांक आहे.'
दरम्यान ही चिंताजनक घटना एप्रिल 2024 मधील आणखी एका घटनेची आठवण करून देणारी आहे. जिथे एका महिला स्कूटरवरून जात असताना तीन पुरुष तिचा पाठलाग करत होते. बेंगळुरूमधील होसूर रोड-कोरमंगला जंक्शनपासून कोरमंगलाच्या 5व्या ब्लॉकमधील नागार्जुन रेस्टॉरंटपर्यंत सेंट जॉन हॉस्पिटलजवळ ही घटना घडली होती.