प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला विचित्र प्रसंग, कार थांबवून 'त्या' तिघांचे असे कृत्य

चित्रपट आणि मालिकेत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.

Updated: Jun 10, 2022, 10:30 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला विचित्र प्रसंग, कार थांबवून 'त्या' तिघांचे असे कृत्य title=

मुंबई : चित्रपट आणि मालिकेत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. आता अशाच एका वाईट अनुभवाचा सामना एका अभिनेत्रीला करावा लागला आहे. या घटनेबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहली आहे, तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची देखील माहिती दिली आहे.  

'पंड्या स्टोअर' या मालिकेत सुमनची भूमिका करणारी कृतिका देसाई हीच्यासोबत एक विचित्र घटना घडलीय. शुटींगवरून परतताना कृतिका यांची कार रस्त्याच्या मधोमध अडवत काही तरूणांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. 

कृतिका देसाईनेही सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्टसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कृतिका तिच्या कारमध्ये बसलेली आहे. कृतिकाच्या ड्रायव्हरसोबत तीन जण वाद घालत आहेत. अभिनेत्रीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले.

अभिनेत्रीची संपूर्ण पोस्ट 

'माझा विश्वास बसत नाही. शूटिंग संपवून मी घरी परतणार होते, इतक्यात रस्त्याच्या मधोमधचं तिघांनी माझी गाडी थांबवली. हे तिघे दुचाकीवरून आले होते. या तिघांनी माझ्या ड्रायव्हरला गाडी थांबायला सांगितली. माझ्या गाडीत ड्रग्जची झडती घेणार असल्याचे ते बोलत होते. या लोकांनी मला त्यांचा फेक आयडी दाखवला.त्यानंतर हे लोक गैरवर्तन करू लागले. 

यानंतर मी त्यांना म्हणाले की लेडी कॉन्स्टेबल कुठे आहे, तिला बोलवा. यावेळी मी या लोकांचा व्हिडिओ बनवला. फिल्मसिटी ते गोकुळधाम दरम्यान ही घटना घडली. हे लोक अशाप्रकारे लोकांना घाबरवत आहेत. उद्या पोलीस ठाण्यात जाऊन या तरूणांबाबत तक्रार करणार असल्याची कृतिका यांनी दिली. तसेच  सर्व कलाकारांनी अशा लोकांपासून सतर्क राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.