प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचं निधन; लेकाच्या लग्नाआधीच घेतला अखेरचा श्वास

कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचं निधन; मुलाच्या लग्नाच्या दोन दिवस आधीच घेतला अखेरचा श्वास  

Updated: Nov 17, 2022, 08:22 AM IST
प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचं निधन; लेकाच्या लग्नाआधीच घेतला अखेरचा श्वास  title=

Nachhatar Gill's wife death : व्यक्ती आनंदात असताना कधी त्याच्यावर वाईट प्रसंग येईल सांगता येत नाही. काही गोष्टींचा आपण विचारही करत नाही आणि ती घटना घडल्यानंतर मनात मोठी पोकळी तयार होते. असंच काही झालं आहे प्रसिद्ध पंजाबी गायक नझतर गिल (Nachhatar Gill) यांच्यासोबत. घरात आनंदाचं वातावरण असताना नझतर गिल यांच्या पत्नी दलविंदर कौर (dalvinder kaur) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी (nachhatar gill wife cancer) होत्या. अखेर 15 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Nachhatar Gill's wife death)
 
धक्कादायक गोष्ट म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी त्यांच्या दलविंदर आणि नझतर यांच्या मुलीचं लग्न झालं होतं. मोठ्या थाटामाटात लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. पण याच दरम्यान पत्नीचं अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. 

मुलीचं लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी मुलाचं लग्न होतं. या महिन्यात गायकाच्या घरात दोन लग्न होते. मिळालेल्या माहितीनुसार, नछतर आणि दलविंदर यांच्या मुलाचं 17 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते, परंतु आईच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे लग्न आता होणार की नाही याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. (nachhatar gill wife photo)

वाचा : Actor Krishna Death : वडिलांचं पार्थिव पाहून लहान मुलाप्रमाणं रडला महेश बाबू

 

गायक नछतर यांच्या पत्नी दलविंदर यांच्यावर 16 नोव्हेंबरला बांगा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नछतर गिलला पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत त्याच्या 'दिल डिट्टा नही सी' गाण्याने ओळख मिळाली. (nachhatar gill wife)

 2022 मध्ये अनेक दिग्गज व्यक्तींनी घेतला अखेरचा निरोप 

अभिनेता महेश बाबूचे वडील आणि तेलुगू सिनेमाचे सुपरस्टार कृष्णा यांचंही वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. 2022 मध्ये सिद्धांत वीर सूर्यवंशी, राजू श्रीवास्तव, दीपेश भान, गान कोकिळा लता मंगेशकर, गायक बप्पी लाहिरी, गायक केके यांसारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला. (gill net worth)