Pavita Punia Photo : 'या' अभिनेत्रीने मांजरीसोबत काढला असा फोटो पाहून चाहते हैराण

अभिनेत्रीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Updated: Aug 1, 2022, 10:16 PM IST
Pavita Punia Photo : 'या' अभिनेत्रीने मांजरीसोबत काढला असा फोटो पाहून चाहते हैराण title=

मुंबई : 'बिग बॉस 14' मध्ये आपल्या गेमने लोकांना प्रभावित करणारी अभिनेत्री पवित्रा पुनियाने असं फोटोशूट केलं आहे की, फोटो व्हायरल होत आहेत. हातात मांजर धरून या अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर अशी ग्लॅमरस आणि हॉट पोज दिली आहे की, फोटो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल. विशेष म्हणजे अभिनेत्रीने हा फोटो इंस्टाग्रामवर बेस्ट कॅप्शनसह शेअर केला आहे. जो सध्या चर्चेत आहे. त्याचबरोबर लोकांचं लक्ष अभिनेत्रीपेक्षा गोंडस मांजरीकडे लागलं आहे.

मांजरीसोबत दिली अशी पोज
या लेटेस्ट फोटोमध्ये अभिनेत्रीने मांजर हातात धरून असा फोटो काढला आहे की, तिचा फोटो चर्चेत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने एका हाताने मांजर पकडलं आहे. तर दुसरा हात सोफ्यावर आहे.

घातला शॉर्ट ड्रेस
या फोटोमध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, पवित्राने तिच्या डोक्यावर  गुलाबाच्या फुलांचा क्राऊन घातला आहे ज्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसतेय.

पवित्राने या फोटोशूटचा फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'संघर्ष खरा आहे आणि फोटो मनाला भिडणारा आहे.' या फोटोसोबत अभिनेत्रीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला बघीरा नावाच्या मांजरीसोबत पोज देणं किती कठीण आहे हे पाहायला मिळतंय. अभिनेत्रीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. यासोबतच काही चाहते कमेंट सेक्शनमध्ये हॉट अशी कमेंट करत आहेत. तर काही चाहते तिला क्यूट म्हणत आहेत.