'कोणाच्या नावाचं सिंदूर...' Pavitra Punia अडकली विवाह बंधनात!

Pavitra Punia लावलं  कोणाच्या नावाचं सिंदूर? फोटो व्हायरल होताचं चर्चांना उधाण  

Updated: Jun 18, 2022, 12:04 PM IST
'कोणाच्या नावाचं सिंदूर...' Pavitra Punia अडकली विवाह बंधनात!  title=

मुंबई : टेलिव्हिजन कलाकार असो किंवा चित्रपट कलाकार.. अनेक स्टार्सनी गुपचूप लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. दरम्यान, 'बिग बॉस' फेम टेलिव्हिजन अभिनेत्री पवित्रा पुनियाने सोशल मीडियावर तिची काही फोटो शेअर केले आहेत, पवित्राचे फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्री गुपचूप लग्न उरकलं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पवित्राच्या फोटोंवर कमेंट करत अनेक चाहते तिला लग्न केलं का? असा प्रश्न विचारत आहेत. सध्या पवित्राचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

अभिनेत्री एजाज खानसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे अनेकदा चर्चेत असते. ती अनेकदा एजाज खानसोबत अनेक ठिकाणी स्पॉट देखील झाली आहे. अशा परिस्थितीत पवित्राचे नवीन वधून रुपात व्हायरल होत असलेले फोटो कोणालाही आश्चर्यचकित करू शकते. 

वधूच्या गेटअपमध्ये पवित्रा पुनियाने स्वतःचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पवित्रा खूपच सुंदर दिसत आहे. पवित्रा पुनिया यांनी लाल साडी, कपाळावर सिंदूर आणि हातात लाल बांगड्या घातल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पवित्राच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केलेल्या आहेत. एका युजरने कमेंट करत 'तू वधूसारखी दिसतेस.' तर दुसऱ्या युजरने 'सिंदूर कोणाच्या नावाचा मॅडम जी.' अशी कमेंट केली आहे.

खरं सांगायचं झालं, तर पवित्राचं लग्न झालं नसून मालिका किंवा फोटोशूट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या अनेक चाहत्यांच्या नजरा पवित्राच्या फोटोंकडे आहे.