'Aashram 3' फेम ईशा गुप्ता लवकरचं अडकणार विवाह बंधनात?

लग्नाबद्दल 'आश्रम 3' फेम ईशाचं मोठ वक्तव्य, अभिनेत्री लवकरचं अडकणार विवाह बंधनात  

Updated: Jun 18, 2022, 10:23 AM IST
'Aashram 3' फेम ईशा गुप्ता लवकरचं अडकणार विवाह बंधनात?  title=

मुंबई : 'आश्रम 3' या वेबसिरीजमुळे अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कायम बोल्ड आणि हॉट भूमिकेत दिसणारी ईशाने आश्रम सीरिजनंतर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सीरिजनंतर चाहत्यांना अभिनेत्रीला सिनेमांमध्ये पाहायचे आहे. त्यामुळे सीरिजमध्ये झळकलेली ईशा सिनेमांमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे 

सध्या ईशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ईशा लग्नाबद्दल मोठ वक्तव्य करताना दिसत आहे. ईशाला एका क्लिनीकबाहेर स्पॉट करण्यात आलं. 

तेव्हा एका पापापाझीने सांगितलं की, 'हा आमचा फोटोग्राफर लग्न करणार आहे... यावर ईशा म्हणते.. का करेल बिचारा लग्न?... मी सुद्ध करणार नाही लग्न...' असं ईशा म्हणाली. त्यामुळे ईशा लग्ना करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ईशाचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ईशाच्या या व्हिडीओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत. ईशाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

सोशल मीडियावर ईशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा कायम स्वतःचे बोल्द आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.