साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण रस्त्यावरच झोपला, पण ही वेळ का आली?

Pawan Kalyan : पवन कल्याण यांच्यावर का आली अचानक रस्त्यावर झोपण्याची वेळ... जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण...

दिक्षा पाटील | Updated: Sep 10, 2023, 01:49 PM IST
साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण रस्त्यावरच झोपला, पण ही वेळ का आली? title=
(Photo Credit : Social Media)

Pawan Kalyan : तेलुगू देशम पार्टी म्हणजेच (टीडीपी) चे अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू यांना कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलं. त्यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी अनेक लोक पुढे आलेत. त्यात पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण आणि ज्येष्ठ नेते नदेंदला मनोहर यांची नावं आहेत. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून एनटीआर जिल्ह्यात कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांना विजयवाडा येथ त्यांना पाठवण्यात येणार असून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कल्याण यांनी शनिवारी चंद्राबाबू नायडू यांच्या नंदयाला येथील अटकेचा निषेध केला आणि माजी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यासाठी विजयवाडा येथे जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कल्याणला हैद्राबादच्या विजयवाडाला हवाईमार्गानं जाण्यासाठी परवाणगी दिली नाही. त्यानंतर त्यांनी रस्त्यानं तिथे पोहोचण्याचा निर्णय केला. शनिवारी त्याच्या ताफ्याला एनटीआर जिल्ह्यात दोनवेळा थांबवले. पवन कल्याण यांना दोन वेळा त्यांच्या गाडीतून उतरवण्यात आले. विजयवाडाच्या दिशेनं जाताना थांबवण्यात आल्यानं पवन कल्याण हे अनुमंचीपल्ली रस्त्यावरच झोपले. त्यानंतर पोलिसांनी पवन कल्याण यांना ताब्यात घेतलं. 

चंद्राबाबू नायडू यांना रविवारी सकाळी (ACB) न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ लुथरा आणि त्यांच्यासोबत त्यांची एक टीम आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांचे प्रतिनिधित्व करत होती. टीडीपीचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते न्यायालयाच्या आवारात एकत्र आले होते.

दरम्यान, चंद्रबाबू नायडू यांना शनिवारी रात्री 3 वाजून 40 मिनिटांना वैद्यकीय तपासणीसाठी विजयवाडा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्याआधी, कुंचनपल्ली येथील सीआयडीच्या (एसआयटी) कार्यालयात सुमारे 10 तास त्यांची चौकशी करण्यात आली. रुग्णालयात सुमारे 50 मिनिटांच्या वैद्यकीय तपासणीनंतर नायडू यांना पुन्हा एसआयटी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर तर त्यांना थेट स्थानिक न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता होती.

याविषयी बोलताना टीडीपीचे प्रवक्ते पट्टाभी राम कोमरेड्डी म्हणाले की, पक्षप्रमुखांचा मुलगा नारा लोकेश, त्याची पत्नी नारा भुवनेश्वरी आणि इतर एसीबी कोर्टात वाट पाहत होते. 'आम्हाला वाटले होते की त्यांना न्यायालयात नेण्याते येईल, परंतु त्यांना एसआयटी कार्यालयात परत नेले. लोकेश आणि भुवनेश्वरी कोर्टात थांबले होते, मात्र अचानक ताफा एसआयटी कार्यालयाकडे वळवण्यात आला.

हेही वाचा : तिसऱ्यांदा आई होणार जिनिलिया? त्या व्हिडीओमुळे उंचावल्या सगळ्यांच्या भूवया

स्किल डेव्हलपमेंट स्कॅम नक्की आहे तरी काय? एकूण 3356 कोटी रुपयांच्या स्किल डेव्हलपमेंट प्रकल्पात आंध्र प्रदेश सरकारने 10 टक्के इतका खर्च केला आणि उर्वरित 90 टक्के निधी सिमेन्स नावाच्या कंपनीने केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात चंद्रबाबू यांनी 371 कोटींचा घोटाळा केल्याचे म्हटले आहे.