तिसऱ्यांदा आई होणार जिनिलिया? त्या व्हिडीओमुळे उंचावल्या सगळ्यांच्या भूवया

Genelia Deshmukh Pregnant : जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 10, 2023, 10:36 AM IST
तिसऱ्यांदा आई होणार जिनिलिया? त्या व्हिडीओमुळे उंचावल्या सगळ्यांच्या भूवया title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Genelia Deshmukh Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि पती रितेश देशमुख या दोघांची जोडी लोकप्रिय आहेत. त्यांची जोडी ही चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान, नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर जिनिलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

रितेश आणि जिनिलिया या दोघांनी नुकतीच मुंबईतील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कॅमेऱ्यासाठी पोज देत असताना. रितेश आणि जिनिलिया पुढे आले. पापाराझींसाठी पोज देत असताना जिनिलियानं मात्र, तिच्या पोटावर हाथ ठेवला. तिचं हे कृत्य पाहता अनेकांनी कमेंट केल्या आहेत की ते दोघं लवकरच पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिजीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

=

रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की मला वाटतं की ती प्रेग्नंट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, आणखी एक मुलं होणार? तिसरा नेटकरी म्हणाला, पुन्हा एकदा प्रेग्नंट? आणखी एक नेटकरी म्हणाला, तिला बाळ होणार आहे का? दुसरा नेटकरी म्हणाला, ती प्रेग्नंट आहे का? भारताच्या वाढत्या जनसंख्येविषयी विचार केला नाही का? तिसरा नेटकरी म्हणाला, तिला तिसरं बाळ होणार आहे का? आणखी एक नेटकरी म्हणाला रितेश जिनिलियासाठी Good News. दुसरा नेटकरी म्हणाला, ती प्रेग्नंट आहे हे तिच्याकडे पाहिल्यावर कळते. 

हेही वाचा : कधी रंगामुळे मीम्सचा शिकार झालेली 'ही' व्यक्ती आहे शाहरुखची खास!

जिनिलिया विषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'ट्रायल पीरियेड' या चित्रपटात दिसली होती. जिनिलिया आणि रितेशविषयी बोलायचे झाले तर ते चित्रपट सृष्टीतील क्यूट कपल आहे. दोघं सोशल मीडियावर सक्रिय असतात. जिनिलिया आणि रितेश यांनी 2 फेब्रुवारी 2012 मध्ये सप्तपदी घेतल्या. रितेश आणि जिनिलिया यांना दोन मुलं आहेत. एका मुलाचं नाव रियान आहे तर त्याचा जन्म 25 नोव्हेंबर 2012 रोजी झाला. तर दुसऱ्या मुलाचं नाव राहिल आहे. राहिलचा जन्म जून 2016 मध्ये झाला.