मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. याप्रकरणी पायल घोषने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पायलचे वकील नितिन सातपुते यांनी सांगितलं की, बलात्कार, गैरवर्तन आणि अशोभनिय कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341, 342 अन्वये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पायल घोषचं बयान दाखल करण्यात आलं आहे. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करणार आहेत. पायल घोषने अटकेची मागणीही केली आहे.
यापूर्वी रात्री 11.20 वाजता पायल घोष तिच्या नितिन सातपुते या वकिलांसह अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचली होती. जवळपास दोन तासांनंतंर रात्री 1.30 वाजता पायल आपल्या वकिलांसोबत ओशिवारा पोलिस स्टेशनमधून बाहेर निघाली होती. परंतु रात्री उशिरा पोहचल्यामुळे आणि पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी नसल्याने तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
@iampayalghosh and @Nitin_Satpute we are at Versova Police Station, pic.twitter.com/Rp7v8iskky
— Adv Nitin Satpute ایڈوکیٹ نتن ستپوتے નિતિન સાતપુતે (@Nitin_Satpute) September 22, 2020
अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषने नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे. याबाबतचं सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षाही धोक्यात असल्याचं सांगत, तिने ट्विटरवर पोस्टवरुन मदतीची विनंतीही केली.
अनुराग कश्यपवरील आरोपांनंतर कंगनाने पायलच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. कंगनाने #MeToo हा हॅशटॅग वापरत, अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली.
Thank you so much for your support @KanganaTeam. This was high time and your support means a lot. We are women and we can together bring all of them down. https://t.co/1NlWH0qngp
— Payal Ghosh (@iampayalghosh) September 20, 2020
दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनीही पालयला पाठिंबा दिला असून पायलकडे याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे. ज्याद्वारे त्या या प्रकरणात कारवाई करु शकतील.