मुंबई : सध्या मनोरंजन जगतापासून दूर असलेल्या नर्गिस फाखरीने नुकतंच काही वक्तव्य केले आहेत. जेव्हा तिचं अचानक वजन वाढलं तेव्हा लोकं तिला कसे टोमणे मारायचे हे अभिनेत्रीने सांगितलं. रणबीरसोबत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने केवळ निवडक चित्रपट केले आहेत आणि सध्या ती मनोरंजन जगतापासून दूर आहे.
नरगिसला ऐकावे लागले टोमणे
चित्रपटसृष्टीचं जग बाहेरून जितकं चकाचक दिसतं तितकंच आतून अंधकारमय आहे. बॉलिवूडमधील कास्टिंग काउचबाबत अभिनेत्री अनेकदा खुलासे करत असतात. याशिवाय बॉडी शेमिंग हा देखील अभिनेत्रींसाठी मोठा मुद्दा बनत आहे. अलीकडेच अभिनेत्री नर्गिस फाखरीने बॉडी शेमिंगबाबत खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, वजन वाढल्यामुळे तिला लोकांकडून टोमणे ऐकावे लागले. एवढंच नाही तर अभिनेत्रीने सांगितलं की, यामुळे ती खूप तणावात राहू लागली आणि ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली.
बॉडी शेमिंगची शिकार
नर्गिस फाखरी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण नुकतीच ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. यानंतर अभिनेत्रीने मुलाखतीत खुलासा केला की तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. नर्गिसने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'मी बॉडी शेमिंगचा सामना केला आहे. इंडस्ट्रीमध्ये असे काही लोकं आहेत जे तुमच्यासाठी एक वेगळा विचार करत असतात. त्यांच्या मते, त्यांनी तुमच्या मनात तुमची जी प्रतिमा निर्माण केली आहे, त्यानुसार तुम्ही दिसायला हवं. त्यामुळे ही गोष्ट सांभाळण्याचा ताण असतो.
लोकं म्हणाले प्रेग्नंट
नर्गिस फाखरी पुढे म्हणाली, 'जेव्हा मी भारतात आले तेव्हा मी खूप बारीक होते. यावर सर्वांनी माझं थोडं वजन वाढवा असं सांगून त्रास दिला. मग मी वर्कआउट्स करून थोडं वजन वाढवलं. जेव्हा माझं वजन वाढलं तेव्हा लोकं मला विचारू लागले की, मी प्रेग्नंट आहे का. हे माझ्यासाठी खूप मजेदार होतं. पण अनेकदा असं झालं की मला खूप वाईट वाटलं. पण नंतर लक्षात आलं की मी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. कारण तुम्ही कधीच कोणाला संतुष्ट करू शकत नाही.