आलिया भट्ट पाठोपाठ अभिनेत्री मौनी रॉय प्रेग्नंट? फोटो पाहून चर्चांना उधाण

छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर आलेली अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 

Updated: Jul 29, 2022, 07:33 PM IST
आलिया भट्ट पाठोपाठ अभिनेत्री मौनी रॉय प्रेग्नंट? फोटो पाहून चर्चांना उधाण title=

मुंबई : छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर आलेली अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे खूप चर्चेत आहे. पण आता सोशल मीडिया जगतात मौनीचे ताजे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांना वेग आला आहे.

खरंतर नुकतंच मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम पेजवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीने पिवळ्या रंगाचा लांब ड्रेस घातला आहे. जो दिसायला एकदम सैल आहे. लेटेस्ट फोटोशूटमध्ये, मौनी रॉय हलक्या मेकअपमध्ये तिचे केस ओपन ठेवून नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. मौनीने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ब्लूम बेबी ब्लूम'. अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट करत  रक्षंदा खानने लिहिलं, 'देवा.. मला हा बेबी बंप वाटला, मला असं वाटतं की, हे मुलींच्या लग्नाचे दुष्परिणाम आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीच्या या फोटोंबाबत अनेक यूजर्सकडून असेच प्रश्न विचारण्यात आले आहेत. मौनीच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली असून आतापर्यंत तिच्या पोस्टवर सुमारे अडीच लाख लाईक्स आले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.