राज कुंद्रा प्रकरण : अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी 'या' करारावर करायच्या मॉडेल सह्या, जाणून घ्या

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर अश्ली-ल फिल्म प्रकरणात पोलिसांना नुकताच एक महत्त्वाचा सुगावा लागला आहे.

Updated: Jul 23, 2021, 07:08 PM IST
राज कुंद्रा प्रकरण : अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी 'या' करारावर करायच्या मॉडेल सह्या, जाणून घ्या

मुंबई : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर अश्ली-ल फिल्म प्रकरणात पोलिसांना नुकताच एक महत्त्वाचा सुगावा लागला आहे. क्राइम ब्रँचच्या हाती आता ते काँन्ट्रेक्ट लागलं आहे ज्यावर मॉडेल्सच्या सह्या घेवून अश्लिल फिल्ममध्ये काम करण्यासाठी बनवलं जायचं. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, या काँन्ट्रक्टवर सही करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींना सही करताना म्हटलं होतं की, त्यांना वेब सिरीजमध्ये काम करावं लागेल. त्या करारामध्ये कोणत्याही शोचे नाव नमूद केलेलं नाही. यासोबत या करारामध्ये असंही लिहिलं होतं की, जर स्क्रिप्टची डिमांड असेल तर त्यांना बोल्ड, टॉपलेस आणि न्यूड सीनसुद्धा शूट करावे लागतील.

पोलिसांच्या आरोपपत्रातही याचा उल्लेख होता.
या प्रकरणांसाठी क्राईम ब्रांचने तयार केलेल्या पहिल्या चार्जशीटमध्येही या स्क्रिप्टचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी तपासात पोलिसांना 'धोखा' नावाच्या चित्रपटाची स्क्रिप्ट मिळाली. जी कलाकारांना दाखवली जायची. त्यामध्ये  सगळे सीन आणि पटकथा लिहिलेली होती. यासोबत न्यूड सीनचा त्यात उल्लेखही होता. त्याचवेळी, जेव्हा एखादा अभिनेता किंवा मॉडेल्सने हे सीन करण्यास नकार द्यायचे तेव्हा त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट दाखवून दबाव आणला जायचा.

अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सने केले खुलासे 
पूनम पांडेपासून ते गहना वशिष्ठपर्यंत आणि अनेक प्रसिद्ध मॉडेल्सनीही पोलिसांसमोर या गोष्टी उघड केल्या आहेत. त्याचवेळी काही पीडित व्यक्तींनी पोलिसांना सांगितलं होतं की, हा संपूर्ण करार इंग्रजी भाषेत झाला आहे आणि सही करताना तेथे उपस्थित लोक आपल्या पद्धतीने आम्हाला ते समजावून सांगायचे व त्यावर सही घ्यायचे. आणि त्यानंतर  शूट करण्याची धमकी देण्यात यायची.

हा होता लेखी करार 
या करारामध्ये असंही लिहिलं होतं की, मला आनंद आहे की, आपण मला आपल्या नवीन वेब सीरिजमध्ये कलाकार म्हणून नियुक्त केलं आहे. माझं वेतन 10 हजार रुपये आहे. फ्लिझ मूव्हीजच्या बॅनरखाली बनवलेली ही वेब सीरीज या दिवशी जगातील एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. मी सहमत आहे की, या चित्रपटासाठी मी लिपलॉक, स्मूच, टॉपलेस न्यूड सीनसारखे इंटिमेट, बोल्ड सीन देईन. मी माझ्या संमतीने हा सीन देत आहे आणि त्यासाठी प्रॉडक्शन हाऊसकडून माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी हे घोषित करते की, प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटातील माझे बोल्ड  टॉपलेस न्यूड सीनला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाइटवर रिलीज करण्यास मला काहीच हरकत नाही. मी या संदर्भात कोणताही दावा किंवा आरोप करणार नाही.