Pooja Bedi: बॉलिवूडमध्ये नाती आणि रिलेशनशिप्सची चर्चा ही अनेकदा सुरू असते. त्यातून कधी घटस्फोट तर कधी ब्रेकअपची चर्चा रंगलेली पाहायला मिळते त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री पूजा बेदीची. पूजा बेदी ही प्रसिद्ध आणि लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी आहे. कबीर बेदी ही 70-80 च्या काळातले सर्वात लोकप्रिय आणि हॅण्डसम हंक असे अभिनेते होते. त्यांच्या लुक्सची तेव्हा चांगलीच चर्चा असायची. त्यांची लेक पूजा बेदी हीसुद्धा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. काही वर्षांपुर्वी कबीर बेदी यांनी प्रसिद्ध मॉडेलशी लग्न केले.
सत्तरी पार केलेल्या कबीर बेदी यांच्या या लग्नाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांचे हे चौथे लग्न होते. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावर पुजा बेदी नाराज होती का? याचीही चर्चा रंगायला सुरूवात झाली होती.
प्रत्येक मुलीचे आपल्या वडिलांसोबत एक खास नातं असते. पूजा बेदीनं आपल्या वडिलांच्या चौथ्या लग्नावर नाराजी व्यक्त केली होती. कबीर बेदी यांनी 2016 साली परवीन दोझांदशी लग्न केले होते. तेव्हा कबीर बेदी यांनी त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या या लग्नावर पूजा बेदी ही नाराज होती. कबीर बेदी यांच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पूजा बेदीनं मात्र आपल्या सावत्र आईला जी आपल्या वयापेक्षा लहान होती तिला एक पोस्टमध्ये चेटकीण असं म्हटलं होतं. लग्न झाल्यानंतर पूजा बेदीनं एक पोस्ट शेअर केली होती ज्यात परवीनला टॅग करत तिनं तिला सुनावलं होतं.
हेही वाचा : ''पहिली 10 मिनिटं...'' Scam 2003 पाहून नेटकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया
या लग्नानंतर पूजा आणि तिचे वडिल कबीर बेदी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता परंतु नंतर ते एकत्र आले होते. त्यातून पूजानं शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की, ''प्रत्येक परीकथेत एक चेटकीण किंवा वाईट सावत्र आई असते. माझ्या आयुष्यात ती आता आली आहे. माझ्या वडिलांनी परवीन दोसांझशी चौथं लग्न केलं आहे.'' तिच्या या पोस्टवरून एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यानंतर तिनं हे पोस्ट डिलिट केली होती आणि आपल्या वडिलांना आणि परवीनला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.