Poonam Pandey Oops Moment:आधीच छोटा टॉप, तोही सरकला वर...नको तेच घडलं

पुनम पांडेने इतका शॉर्ट टॉप घातला होता की ती oops momentची शिकार झाली.

Updated: May 15, 2022, 10:47 AM IST
Poonam Pandey Oops Moment:आधीच छोटा टॉप, तोही सरकला वर...नको तेच घडलं title=

मुंबईः पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते, तिला रोज कुठे ना कुठे स्पॉट केलं जातं. अलीकडेच ती साईशा शिंदेसोबत दिसली होती आणि यादरम्यान तिने इतका शॉर्ट टॉप घातला होता की ती oops momentची शिकार झाली.

लॉक अप' या रियालिटी शोनंतर पूनम पांडेची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. एकेकाळी तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंसाठी ओळखली जाणारी पूनम पांडे आज 'लॉक अप'मुळे खूप चर्चेत आहे आणि ती पुन्हा स्पॉट झाली आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक टॉपमध्ये दिसत आहे पण या ब्लॅक टॉपमुळे तिला Oops momentची शिकार व्हावं  लागलं.

पूनम पांडे ब्लॅक टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसली मात्र पूनमचा हा टॉप इतका लहान होता तो अनेकदा वर सरकत होता. यामुळे ती Oops momentची शिकार झाली. पूनम पांडे या व्हिडीओत सायशा शिंदेसोबत (Saisha Shinde) दिसली.

'लॉक अप' हा रियालिटी शो संपल्यापासून या शोचे स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. सायशानंतर पूनमने नुकतीच पायल रोहतगीचीही भेट घेतली. दोघांनी मॅचिंग ब्लॅक आउटफिट कॅरी केले होते.

पूनम पांडेचं  (Poonam Pandey) 'लॉक अप' हा रियालिटी शोमध्ये चांगलंच यशस्वी ठरलं आहे. पूनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, लॉकअप ट्रॉफी तिच्यासाठी तितकी महत्त्वाची नव्हती जितकं लोकांसोबत बोलणं आणि कनेक्ट होणं.पूनम म्हणाली की, या शोनंतर मला ज्याप्रकारचे प्रेम आणि आदर मिळत आहे, तो मला खूप आवडतो कारण मी त्यासाठी तळमळत होते, कामासाठी तळमळत होते. लॉकअपनंतर मला वेब सीरिजच्या ऑफर्स येत आहेत.