Poonam Pandey Death: पूनम पांडेचा शेवटची व्हिडीओ पोस्ट पाहिली का? गोव्यात...

Poonam Pandey Last Instagram Post: पूनम पांडेनं निधनाच्या तीन दिवस आधी केली होती अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट...

दिक्षा पाटील | Updated: Feb 3, 2024, 01:00 PM IST
Poonam Pandey Death: पूनम पांडेचा शेवटची व्हिडीओ पोस्ट पाहिली का? गोव्यात... title=
(Photo Credit : Social Media)

Poonam Pandey Death News : 32 वर्षांची मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. पूनम पांडेच्या निधनाची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सगळ्यांच्या मनात तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर एकच प्रश्न पडला आहे की ही बातमी खरी आहे का? त्यात आता पूनमची सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.  

पूनमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तीन दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यात तिचा एक व्हिडीओ आहे. या व्हिडीओत ती गोवामध्ये एका क्रुझवर असल्याचे पाहायला मिळते. तर तिथे एका पार्टीत तिनं गेस्ट म्हणजे पाहूणी म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिनं पांढऱ्या रंगाचा एक सिझलिंग टॉप परिधान केला आहे. तर तिला सुरक्षा म्हणून तिच्या आजुबाजूला बॉडीगार्ड असल्याचे पाहायला मिळते. तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे का ही व्हिडीओ पाहून वाटतं नाही की तिला सर्वाइकल कॅन्सर सारखी गंभीर आजार होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, पूनम पांडेच्या निधनाविषयी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कळवण्यात आलं. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ''आजची सकाळ आमच्यासाठी फार कठीण होती. तुम्हाला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आपण पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. या दु:खाच्या काळात, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती आहे". पूनम पांडेची ही अखेरची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर कमेंट करत नेटकरी तिच्या आत्म्याला शांती मिळो अशा कमेंट करताना दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना तर या बातमीवर विश्वास बसत नाही. कारण कोणी तिला तीन दिवसांपूर्वी भेटलं होतं तर कोणी तिच्याशी 10 दिवसांपूर्वी चर्चा केली होती. तर गेल्या अनेक दिवसांपासून पूनम कॅन्सरनं त्रस्त होती असं म्हटलं जातं आहे. 

हेही वाचा : मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू; इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दावा

पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 रोजी कानपुरमध्ये झाला होता. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिनं 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केला. ती अखेरची 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटात दिसली होती. छोट्या पडद्याविषयी बोलायचे झाले तर तिनं 'खतरों के खिलाडी 13' आणि कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.