चटपटीत, तिखट, गोड... Pani Puri समोर आल्यावर Priyanka Chopra ने काय केलं? Video झाला व्हायरल

प्रियंका आपली परंपराही तिथं अमेरिकेतही जपताना दिसते.

Updated: Sep 24, 2022, 08:42 PM IST
चटपटीत, तिखट, गोड... Pani Puri समोर आल्यावर Priyanka Chopra ने काय केलं? Video झाला व्हायरल

Priyanka Chopra Gol Gappa: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या मुलीचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. नुकताच तिनं आपल्या मुलीचा म्हणजेच मालतीचा (Malti Marrie Jonas Chopra) एक फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोला लाखो लोकांनी लाईक आणि कमेंट केलं आहे. प्रिंयका सध्या हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. (Popular actress priyanka chopra tries panipuri at newyork event video goes viral)

प्रियंका आपली परंपराही तिथं अमेरिकेतही जपताना दिसते. त्यामुळे आज तिनं आपली जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या अभिनेत्रीच्या चर्चा केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही होतात. काही हॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये (Hollywood Movies and Webseries) काम करून प्रियांका चोप्राही तिथल्या लोकांची आवडती स्टार बनली आहे. अलीकडेच देसी गर्लने संयुक्त राष्ट्र महासभेत 2022 च्या 'SDG मोमेंट'च्या बैठकीला हजेरी लावली होती. आता प्रियंका तिच्या सोना रेस्टॉरंटमध्ये (Sona Restaurant) मित्रांसह जेवणाचा आनंद घेते आहे. 

प्रियंका चोप्राचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) झाला आहे. यावेळी ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फारच दिसत आहे. प्रियंका चोप्रा शुक्रवारी न्यूयॉर्कमधील तिच्या स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती. या व्हिडिओत तिच्यासोबत नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईही (Malala Yusufzai) दिसत आहे. त्याचवेळी प्रियंकासोबत पती निक जोनासही (Nick Jonas) दिसला. प्रियंका चोप्रानं तिच्या पती आणि मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळीच प्रियांकाही गोलगप्पांचा (Gol Gappa) आनंद लुटताना दिसली. प्रियांकाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप पसंत केला जात आहे. प्रियांका सध्या न्यूयॉर्कच्या टूरवर आहे. प्रियांका काही निवडक रेस्टॉरंटमध्येही दिसली. यानंतर गुरुवारी प्रियंका नाईट आऊटवर जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.