Actor Shooed Away from the House : चित्रपटसृष्टीनं कोणाला हीरो बनवलं तर कोणाला झिरो... मात्र, जे हीरो होतात त्यांना पाहून इतरांमध्ये आपणही काही तरी करावं अशी इच्छा तयार होते. दरम्यान, असंच काहीसं एका अभिनेत्याकडे पाहिल्यावर अनेकांना वाटतं. आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर तो दुसरा कोणी नसून अभिनेता अक्षय कुमार आहे. तर एक वेळ होती जेव्हा मुंबईतील एका बंगल्या समोर उभा राहून अक्षय कुमार फोटो काढत होता. त्यावेळी तिथल्या गार्डनं त्याला सर्वसामान्य माणूस समजून तिथून हकलवलं. मात्र, त्या घटनेनंतर जे झालं ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं.
खरंतर अक्षय कुमारनं तो बंगला काही काळानंतर खरेदी केला आणि आज तोच बंगला हे त्याचं घर आहे. यूट्यूबवर एक व्हिडीओ आहे ज्यात अक्षय कुमारनं स्वत: याविषयी सांगितलं होतं. अक्षयनं सांगितलं की तो त्यावेळी एका फोटोग्राफरसाठी काम करत होता. त्या कामाच्या बदल्यात अक्षयला पैसे नको होते. फोटोग्राफरला तो म्हणायचा की हे पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. काही महिन्यांनंतर अक्षय त्या फोटोग्राफरला म्हणाला, तुम्ही माझं फोटोशूट कराल का? त्यावर त्यांनी लगेच होकार दिला.
त्यानंतर अक्षयनं जुहूला गेला. जवळपास एक तुटका बंगला होता. या बंगल्या समोरच अक्षय कुमार लोळला तो फोटो क्लिक करु लागला. पण त्याच दरम्यान, गार्डनं त्याला पाहिलं आणि तिथून पळवून लावलं. अक्षयनं सांगितलं की त्यानं स्वत: कधी हा विचार केला नव्हता की या बंगल्याच्या ठिकाणी जी बिल्डिंग बनवण्यात येईल तिथे तो राहणार. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणाहून त्याला हकलवण्यात आलं त्याच ठिकाणाचा तो मालक आहे.
हेही वाचा : 'मुलगा गोरा आणि मुलगी सावळी...'; प्रश्न विचारणाऱ्यांना ट्विंकलचे सडेतोड उत्तर म्हणाली...
दरम्यान, मॅजिक ब्रिक्स वेबसाइटप्रमाणे, अक्षय कुमारच्या घराची किंमत ही 80 कोटी रुपये आहे. अक्षय अनेकदा त्याच्या घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याच्या या घराची अक्षय कुमार खूप काळजी घेताना दिसतो. तर जीक्यू या वेबसाईट प्रमाणे अक्षय कुमारची नेटवर्थ ही 2500 कोटी आहे. अक्षय कुमारकडे रोल्स रॉयस फॅंटम VII, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी आणि मर्सिडीज बेंजसोबत अनेक लग्झरी गाड्या आणि प्रॉपर्टी आहेत.