'एक विलेन'च्या आइटम साँन्गसाठी विचित्र डिमांड, प्राचीने व्हॅनिटीव्हॅनमध्ये स्वत:ला बंद करुन घेतलं

प्राची देसाईने 'कसम से' मालिकेतून टीव्ही विश्वात पर्दापण केलं. या मालिकेत प्राचीला इतकं यश मिळालं की, तिला बॉलिवूड चित्रपट मिळाला

Updated: Apr 22, 2021, 08:03 PM IST
'एक विलेन'च्या आइटम साँन्गसाठी विचित्र डिमांड, प्राचीने व्हॅनिटीव्हॅनमध्ये स्वत:ला बंद करुन घेतलं

मुंबई : टीव्ही सीरियलच्या जगातून बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या टीव्ही स्टार्सच्या यादीत प्राची देसाईचं नाव देखील समाविष्ट आहे. मात्र, प्राचीला बॉलिवूडमध्ये फारस यश मिळालं नाही. प्राची देसाईने एकता कपूरची मालिका 'कसम से' मधून टीव्हीमध्ये पदार्पण केलं. या मालिकेत प्राचीला इतकं यश मिळालं होते की, तिला बॉलिवूड चित्रपट मिळाला. प्राचीचा पहिला चित्रपट 'रॉक ऑन' सुपरहिट ठरला. प्राचीच्या चित्रपट करिअरमध्ये वाद देखील आहे, जे फार कमी लोकांना माहित आहे. त्या कथेवर एक नजर टाकूया

'एक विलेन'च्या आइटम सॉन्गनंतर प्राचीला डिमांड
'रॉक ऑन' या चित्रपटानंतर प्राची अनेक चित्रपटांमध्ये दिसली. या चित्रपटांमध्ये 'लाइफ पार्टनर', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'तेरी मेरी कहानी', 'बोल बच्चन' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांनंतर प्राचीने काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि आयटम साँन्ग केलं हे गाणं 'खलनायक' या चित्रपटात दिसलं.

मीडिया रिपोर्टनुसार, या आयटम ,साँन्गच्या शूटिंग दरम्यान प्राची देसाई भडकली होती.  ब्रेस्टमध्ये सिलिकॉन पॅड वापरण्याची मागणी केल्यामुळे ती चिडली होती. या आयटम साँगचे बोल 'आवारी हैं' असे आहेत. असं म्हणतात की, प्राचीला या गाण्यातील हॉट एक्सप्रेशन द्यायला जमत नव्हते. यासाठीच तिच्या संपूर्ण टीमने तिच्यावर बरीच मेहनत घेतली.

या गाण्यात प्राचीने डिपनेक ब्लाउज आणि स्कर्ट परिधान केला होता. या टीमने प्राचीला ब्रेस्टमध्ये सिलिकॉन पॅड्स घालायला सांगितले तेव्हा तिने तसं करण्यास नकार दिला. आणि यानंतर तिनं स्वत: ला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद करुन घेतलं

ऐकताने समजवल्यावर शुटिंग पूर्ण झालं
यासह, प्राचीने अशी अट घातली होती की, तिची माफी मागितल्याशिवाय ती पुन्हा गाण्याचे शूटिंग सुरू करणार नाही. प्राचीचा राग पाहून सेटचं वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर, निर्माता एकता कपूरला सेटवर बोलविण्यात आले आणि तिची समजूत घातल्यानंतर प्राची पुन्हा गाण्याचे शूट करण्यास तयार झाली.