Prakash Raj Supports Shahrukh Khan And Deepika Padukone Pathan After Contraversy: शाहरुख खानच्या (shahrukh khan) 'पठाण' चित्रपटाचे पहिले गाणे 'बेशरम रंग' सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या गाण्यात दीपिका पादुकोणने (deepika padukone) भगव्या रंगांची बिकिनी परिधान केली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. 'पठाण' चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. या सगळ्यात अभिनेता प्रकाश राजनं 'पठाण' चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.
प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंचवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत प्रकाश राज यांनी नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश यांनी ट्वीट करत लिहिलं, '#बेशरम. जेव्हा भगवा पोशाख परिधान करून बलात्कारी पुरुषाच्या गळ्यात हार घालतात, त्याचा सन्मान करतात, भगवा पोशाख घालून आमदार द्वेषपूर्ण भाषण करतात, हेच आमदार दलाली करतात, भगवा घातलेले स्वामीजी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करतात तेव्हा तुम्हाला भगवा चालतो पण चित्रपटामध्ये भगवा ड्रेस चालत नाही? #सहज विचारलं.'
#Besharam BIGOTS.. So it’s okay when Saffron clad men garland rapists..give hate speech, broker MLAs, a Saffron clad swamiji rapes Minors, But not a DRESS in a film ?? #justasking
….Protesters Burn Effigies Of SRK In Indore. Their Demand: Ban 'Pathaan' https://t.co/00Wa982IU4— Prakash Raj (@prakashraaj) December 15, 2022
पुढे ट्वीटमध्ये प्रकाश राज म्हणाले, 'आंदोलकांनी इंदौरमध्ये शाहरुखच्या पुतळ्याचं दहन केलं. त्यांनी पठाणवर बंदी घालण्याची मागणी केली.' प्रकाश राज यांच्या या ट्वीटनंतर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं तर काही नेटकऱ्यांनी ते बरोबर बोलत आहेत असे म्हटले.
'पठाण' सिनेमात 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकानं मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊटफिट परिधान केल्याचा दावा हिंदू संघटनांकडून केला जात आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचा रंग परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम परिधान केल्याचे म्हणत टीका होत आहे.
इतके सर्व रंग अस्तित्वात असताना या गाण्यासाठी फक्त भगवा रंग चं का निवडला असावा. त्याठिकाणी हिरवा रंग का निवडावा वाटला नाही? आणि जरी असला तरी "बेशरम रंग" या आशयाच्या गाण्यात आमच्या भगव्या रंगाला जाणीवपूर्वक टाकल आहे, आणि याशिवाय भगव्या रंगात अभिनेत्रीला अर्ध-नग्न देखील दाखवलं गेल असल्याची टीका होत आहे. (Prakash Raj comes out in support of Deepika Padukone over saffron bikini row calls trolls Besharam)
'पठान' चित्रपटात दीपिकाने भगव्या रंगाचे कपडे अश्लील पद्धतीने परिधान केले आहेत. गाण्याचे बोल देखील बेशरम रंग असं आहेत. हा हा भगवा आणि सनातन धर्माचा अपमान आहे. ज्या भगव्याने संपूर्ण देशाला आणि जगाला दिशा देण्याचे काम केले त्याला निर्लज्ज रंग म्हटले जात आहे. सेन्सॉर बोर्डने हे गाण प्रदरर्शित करण्याला कशी काय परवानगी दिली असा सवाल हिंदू संघटनांनी उपस्थित केला आहे. या गाण्याचे बोल आणि दीपिकाचा ऑऊटफिट चेंज करावा अन्यथा सिनेमागृहांमध्ये चित्रपट तालू देणार नाही असा इशारा देखील हिंदू संघटनांनी दिला आहे. ट्विटरवर देखील #BoycottPathan ट्रेंड पहायला मिळाला आहे.