'पंतप्रधान नरेंद्र मोदी' बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता साकारणार विरोधी भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. बायोपिकमध्ये कोणती भूमिका कोण साकारणार हे हळू-हळू समोर येत आहे. 

Updated: Feb 19, 2019, 11:37 AM IST
'पंतप्रधान नरेंद्र मोदी' बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता साकारणार विरोधी भूमिका title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. बायोपिकमध्ये कोणती भूमिका कोण साकारणार हे हळू-हळू समोर येत आहे. सिनेमाता पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार असून सिनेमात विरोधी भूमिका कोण साकारणार हे समोर आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधी भूमिकेत अभिनेता प्रशांत नारायणन झळकणार आहेत. देशातील सर्वात मोठे उद्योगपती आदित्य रेड्डींच्या भूमिकेत प्रशांत दिसणार आहे. प्रशांतने अहमदाबादमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. 

Image result for prashant narayanan zee news 

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी दिसणार आहेत. सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्टा साकारणार आहेत. मोदींच्या आईंच्या भूमिकेत वरिष्ठ अभिनेत्री जरीना वहाब दिसणार आहेत.  

सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. सिनेमात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार मोठ्या पद्यावर दिसणार आहेत. सिनेमा विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे.