Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापट ही सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. सध्या ती मराठीतच नाही तर हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये आपलं नावं कमावते आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली असते. प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. त्यातून आता तिचा विस्फोट नावाचा एक नवा हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली आहे. सध्या तिचं 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग जोरात सुरू आहेत. आता या नाटकाची संपुर्ण टीम ही ऑस्ट्रेलियाला गेली आहे. त्यामुळे सध्या ते आपल्या सोशल मीडियावरून याचे फोटोही पोस्ट करताना दिसत आहेत. त्यांच्या या ऑस्ट्रेलियाच्या ट्रीपचे फोटो हे व्हायरल झाले आहेत. यावेळी त्यांचे स्विमिंग पूलमधील फोटो हे चर्चेत आहेत.
यावेळी ऑस्ट्रेलियातील जकूझी बाथमध्ये त्यांची संपुर्ण टीम ही मस्त एन्जॉय करताना दिसते आहे. प्रिया बापट, पल्लवी अजय, आशुतोष गोखले आणि उमेश कामत यांनी यावेळी या गरम पाण्यात मस्तपैंकी आपले वेकेशन एन्जॉय केलं आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांच्या या फोटोंवर नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. यावेळी अनेकांनी प्रियाला ट्रोलही केलं आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी अभिनेत्री मिताली मयेकर हिच्या बिकीनी लुकमुळे बराच वादंग माजला होता. त्यातून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तिच्या या बोल्ड फोटोंमध्ये तिची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. तिला मात्र प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता प्रिया बापटलाही प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपुर्वी प्रिया बापट हिनं अभिनेता उमेश कामतसोबतचा एक लिपलॉक फोटो त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेअर केला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. त्यातून तिनं शेअर केलेल्या या कॅप्शनचीही प्रचंड चर्चा रंगलेली होती. त्यापुर्वी तिच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील लेस्बियन सीनची फार चर्चा होती.
प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं हे नवं नाटकं आहे ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यांच्या 'नवा गडी नवं राज्य' या नाटकाची बरीच चर्चा रंगलेली होती. त्यामुळे हे नाटकं तूफान गाजलं होतं. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंटही केली होती. काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. काहींनी मराठी संस्कृती बिघडवताय असं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, हे तर बॉलिवूडचं अंधानुकरण आहे.