खरंतर रक्ताचं नातं! ...पण रणबीर कपूर सोबत काम करण्यास बिग बींच्या नातवाचा थेट नकार

Agstya Nanda Ranbir Kapoor : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अग्स्त्या नंदा ह्याची. त्याच्या आगामी चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार असं कळते की त्यानं रणबीर कपूरचा चित्रपट चक्का नाकारला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 11, 2023, 04:39 PM IST
खरंतर रक्ताचं नातं! ...पण रणबीर कपूर सोबत काम करण्यास बिग बींच्या नातवाचा थेट नकार title=
amitabh bachchan grandson rejects ranbir kapoor offer to work with him

Agstya Nanda Ranbir Kapoor : आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती असेलच त्यांचा नातू अग्स्त्या नंदा हा लवकरच आर्चिज या नेटफ्लिक्सच्या नव्याकोऱ्या वेबसिरिजमधून पदार्पण करणार आहे. या वर्षी 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटातून एकावेळीच तीन मोठे स्टारकीड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली होती. तेव्हा हा चित्रपट स्टारकीड्सनी भरलेला आहे. त्यातून या चित्रपटाच्या पहिल्या लुकवर अनेकांनी टीकाही केली होती. मल्टिव्हर्स ऑफ नेपोटिझम म्हणून या चित्रपटाकडे पाहण्यात आले होते. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगेलली होती. या चित्रपटासोबत आता अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा याला अनेक चित्रपट मिळत आहेत. 

यावेळी त्यानं रणबीर कपूरसोबत काम करण्यास नकार दिला असल्याची चर्चा ही रंगलेली आहे. 'रामायण' या चित्रपटाचीही सध्या जोरात चर्चा आहे. त्यामुळे 'रामायणा'तून रणबीर कपूरसोबत काम करण्यासाठी अगस्त्या नंदाला ऑफर आली होती परंतु ती त्यानं नाकारली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. 'रामायण' या चित्रपटातून अगस्त्या नंदा याला लक्ष्मणाची भुमिका साकारली होती. परंतु तीही त्यानं नाकारल्याची चर्चा आहे. नक्की यामागील कारण असं समोर आलं आहे की अगस्त्या नंदाकडे सध्या बरेच प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे त्यानं या चित्रपटाला नकार दिला आहे. 

हेही वाचा : फोटोत दिसणाऱ्या दोन लहान मुलींचं बॉलीवूडशी कनेक्शन, एकीचे निधन तर दुसरी...

rediff च्या रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. यावेळी त्यानं आर्चिजचं शुटिंग पुर्ण केलं आहे. 'इक्कीस' या चित्रपटातूनही तो काम करणार आहे. यावेळी अगस्त्यानं हा रोल नाकारल्यामुळे त्या अभिनतेत्याच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्याचा शोध सुरू झाला आहे. या चित्रपटाचे शुटिंग हे 2024 मध्ये सुरू होणार आहेत. सध्या रणबीर कपूरच्या एनिमल या चित्रपटातील एक गाणं हे आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामुळे चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली आहे. या चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी रणबीर कपूर हा ईडीच्या रडारवर आहे.